- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Pankaja Mundhe:पंकजा मुंढे यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात नव्या चर्चेला उधाण; म्हणाल्या शिवाजी पार्कवर एकदा सभा भरवायची...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेला पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज भगवान गडाच्या पायथ्याशी साजरा झाला. पंकजा मुंडें यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा तर साधत असताना असा काही टोला मारला की, त्यांच्या एका वाक्याने पुन्हा राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले.
photo:facebookpage"यंदाचा मेळावा झाला ते जाऊ द्या, पुढच्या वर्षी आपण सर्व रेकॉर्ड तोडू. एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचाच आहे," असे विधान पंकजा मुंडे यांनी करून राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले.
दरवर्षी शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा भरत असतो. ही शिवसेनाची परंपरा आहे. आता पंकजा मुंडे यांनी पुढच्या वर्षी शिवाजी पार्क भरवायचे असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण परत बदलले. कारण पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार असल्याचा चर्चा पहिलेच सुरू आहे.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला गेला,मात्र मला जसे आत जायचे माहित आहे, तसेच बाहेर कसे यायचे हे पण माहित आहे. माझ्या विरोधात राजकारण सुरू आहे, मात्र मी खंबीर आहे, असे देखील मुंडे म्हणाल्या.
माझी राजकिय कारकीर्द संपल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र, मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन, असे मुंडे यांनी ठाम सांगितले.
पंकजा मुंडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे. त्याबद्दल बोलताना पंकजा यांनी म्हटलं की, मला जे पद मिळालं आहे ते माझ्या प्रवासातील मला मिळालेली संधी आहे. ही संधी तुमच्या भल्यासाठी आहे. महाराष्ट्र सोडून निघून चालले असं काही नाही. बीड, महाराष्ट्र माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी इथेच राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा