- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
उत्सवाच्या आठव्या दिवशी 'वुमन्स डॉक्टर्स विंग'च्या नऊ सदस्यांनी नऊ वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करून देवीची विविध रूपे साकारली.
अकोला: आयएमए,अकोला शाखेच्या 'वुमन्स डॉक्टर्स विंग'ने कोरोनाच्या काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कोटेकोरपणे पालन करीत ऑनलाईन पद्धतीने नवरात्री महोत्सव मोठ्या थाटात आणि उत्साहात साजरा केला.
नवरात्र उत्सवात नऊ दिवस त्या त्या दिवसाच्या रंगाच्या अनुषंगाने वेश परिधान करून महिला डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या महोत्सवात सहभाग नोंदविला. दररोज सायंकाळी आरती घेण्यात आली.
त्यानंतर ब्रम्हाकुमारी शिवानी दीदी आणि उषादीदी यांचे देवी महात्म्यावर प्रबोधन दाखविण्यात आले. याप्रसंगी देवीच्या उपासनेवर आधारित नृत्येही दाखविण्यात आली. उत्सवाच्या आठव्या दिवशी 'वुमन्स डॉक्टर्स विंग'च्या नऊ सदस्यांनी नऊ वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करून देवीची विविध रूपे साकारली. राणी सती मंदिरामध्ये आरती करण्यात आली.
यामध्ये 'वुमन्स डॉक्टर्स विंग'च्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी मोरे, सचिव डॉ. निर्मला रांदड, डॉ. आशा निकते, डॉ. शिल्पा चिराणिया, डॉ. मोनिका वायचाळ, डॉ. नयना तेलकर, डॉ. अंजली सोनोने, डॉ. क्षितीजा मराठे, डॉ. रूपाली पाचकोर या महिला डॉक्टरांनी सहभाग घेतला.
या महोत्सवात सहभागी सदस्यांनी पहिल्या दिवशी ग्रे (करडा), दुस-या दिवशी ऑरेंज (नारंगी), तिस-या दिवशी अॅप्रॉनसह व्यावसायिक परिवेश (पांढरा), चवथ्या दिवशी रेड फ्लॉवर्ससह (लाल), पाचव्या दिवशी ब्ल्यू स्काय(निळा), सहाव्या दिवशी यलो गोल्ड (पिवळा), सातव्या दिवशी ग्रीन टी (हिरवा), आठव्या दिवशी पिकॉक कलर (मोरपंखी) आणि नवव्या दिवशी पर्पल पर्ल (जांभळा) असा 'कलर आणि थीम' यांचा संगम साधून या महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्व ऑनलाईन अभिनव उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याची माहिती 'वुमन्स डॉक्टर्स विंग'च्या सचिव डॉ. निर्मला रांदड यांनी दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा