Navratri2020: नवरात्र निम्मित देवी कुंकुमार्चन पूजन;आमदार शर्मा यांच्या हस्ते जोशी यांचा सत्कार

गेल्या दहा वर्षापासूनची परंपरा खंडित न होवू देता, यावेळी निवडक मातृशक्तीची उपस्थित माँ दुर्गा, आई तुळजाभवानी देवीच्या कुंकूमार्जन कार्यक्रम वैदिक पद्धतीने वेदाचार्य यज्ञेश जोशी यांच्या मधुरवाणीत वेदमंत्राने कार्यक्रम करण्यात आला.



अकोला: वेदाचार्य यज्ञेश जोशी हे संस्कार तसेच प्राचीन संस्कृती जतनाचे कार्यामध्ये तसेच धर्म संस्कार संदर्भात मातृशक्तींना जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन करून संस्कृत भाषा सोबत शांती अमन व भक्तिमार्ग दाखवण्याचे कार्य करीत आहे, ही गौरवशाली बाब असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.



जोशी यांनी विष्णुसहस्त्रनाम पठण व शिकवण्याचे कार्य अधिक महिन्यात कोणताही मोबदला न घेता सामाजिक दायित्व म्हणून केल्याबद्दल श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आमदार गोवर्धन शर्मा यांनी श्रीफळ शाल देऊन मंगळवारी गौरवांकीत केले. याप्रसंगी आमदार शर्मा बोलत होते.




श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभो  मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ तसेच श्री गुरुकुलम् आचार्य यज्ञेशजी जोशी यांच्या वतीने  " देवी कुंकुमार्चन  पूजन "अश्विन शुक्ल चतुर्थी पर्वावर २० ऑक्टोंबर मंगळवार रोजी  : स्थानिक रविनगर येथे तसेच अधिक मास मध्ये "विष्णुसहस्त्रनाम" व "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः "या मंत्राचा जप एक कोटी ४४ लाख १९३२ संख्येत करण्यात आला. या मंत्राचा दशांश मार्जन व हवन मातृशक्तींचा उपस्थित करण्यात आला.    


श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकाराने हे अनुष्ठान करण्यात आले. समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, अशोक गुप्ता, अनिल मानधने, ब्रिजमोहन चीतलांगे, डॉक्टर अभय जैन, अनिल थानवी, गिरीराज तिवारी, गिरीश जोशी,  पुष्पा वानखडे, रेखा नालट, मनीषा भुसारी, अर्चना शर्मा, आरती शर्मा, कल्पना अडचुले, पद्मा अडचुले, अलका देशमुख सारिका देशमुख, मीरा वानखडे, रेखा लोणकर, कल्पना भालेराव, रोहिणी कुळ वाले, दीपाली चोपडे, प्रीती कुरवाले, सुनिता बाहेकर, दीपाली लोणकर, मनु इंगोले, हर्षली लोणकर, विमल मापारी,


 

रसिक पुरवाले, प्रगती बाहेकर, सचिता कुर वाले, वंदना दांदळे, मालती रणपिसे, अर्चना शर्मा, सोनल शर्मा, संतोष शर्मा, सुरेखा अग्रवाल, श्वेता गुप्ता, कविता मानधने, सुनीता जोशी, अलका देशमुख,  वसुधा बिडवई, सुजाता वानखडे, प्रीती अडचूले, शुभांगी उमक, रेश्मा राऊत, अर्चना खांदेल, मंगला शर्मा, दिया शर्मा, सुनीता गावन्डे, इंदू थोटांगे, ज्योती थोटांगे, दुर्गा जोशी, गीता इंगळे, रंजना हरकरे, हेमलता सुळे, सुनंदा पुरी, पुष्पा सुळे, सुंनदा सोरटे, छाया नेहरे, अर्चना जयस्वाल कुमुद भोम्बळे, लीलावती हिवराळे, मीना रणपिसे, पद्मा वानखडे, मंजुळा वानखडे, चंद्रभागा ढवळे, मनु उकर्डे, ताईबाई भोम्बळे, लीला खेडकर, सुनीता सावजी, अनुपमा भगत, वैशाली सावजी, कौशल्या तायडे, देवका बुलबुले, संदीप वाणी, नितीन जोशी, राम ठाकूर, मोहन गुप्ता,  हेमंत शर्मा, अजय शर्मा, विजय इंगळे, विनोद मापारी, सतीश ढगे, राजेंद्र गिरी टोनी जयराज, सोहम अडचूले, रवींद्र वानखडे, आशा गोयंका, शीला तिवारी आदींच्या सहकार्याने श्री रामनवमी शोभायात्रा समितीने श्री जानकी वल्लभो  मातृशक्ती जागरण मंडळ अधिक मासा च्या पर्वावर जप केला.  





श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने हवन विधि तसेच आकर्षक मूर्तीची स्थापना वेदिक मंत्राने पंडित जोशी व शर्मा यांनी केली. यावेळी या भागातील मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन व कार्यक्रमाच्या आयोजक मनीषा भुसारी यांचे सुद्धा रामनवमी शोभायात्रा समितीतर्फे स्वागत करण्यात आले.

टिप्पण्या