- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कोरोना प्रार्दुभाव पाहता यंदा नवरात्र महोत्सव अत्यंत साधे पध्दतीने साजरा करण्यात येऊन झाकी सुध्दा या वेळेस नसणार असल्याचे उजवणे परिवारा तर्फे यावेळी सांगण्यात आले.
अकोला: ज्येष्ठ व्यवसायिक व समाजिक कार्यकर्ते नाना उजवणे यांच्या परिवारा तर्फे रामदास पेठ परिसरातील योगायोग नवदुर्गा महोत्सवाचे रविवारी मोठ्या भक्तिभावात भूपिपुजन झाले. आगामी नवरात्रासाठी मंडपाच्या भुमीपुजनाचा सोहळा मान्यवरांचे उपस्थितीत सामाजिक अंतर राखीत पार पडला.
यावेळी नाना उजवणे यांनी सपत्नीक पुजा अर्चना करुन कुदळ चालवून भुमिपुजन केले. यंदा महोत्सवाचे ४२ वे वर्ष असुन दरवर्षी नवरात्रोत्सवात सामाजिक, धार्मिक व पौराणीक देखावे सादर होत असतात, त्याच प्रमाणे दररोज सामुहीक दुर्गा चालीसा पठण व महिला व विद्यार्थ्यासाठी प्रोत्साहानार्थ रांगोळी, चित्रकला स्पर्धा ,थाली सजावट, वेशभुषा, भजन स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. उत्सवात माता जगदंबेचा भव्य मंडप सर्वांचे आकर्षण असते. पण कोरोना प्रार्दुभाव पाहता यंदा नवरात्र महोत्सव अत्यंत साधे पध्दतीने साजरा करण्यात येऊन झाकी सुध्दा या वेळेस नसणार असल्याचे उजवणे परिवारा तर्फे यावेळी सांगण्यात आले.
या भुमीपुजन कार्यक्रमास मंत्री, वैद्य, देशपांडे, राहुल राठी, चिंचोळकर, अग्रवाल,
किशोर सोपले, आसरकर, दिलीप दौड, प्रविण पिसे, सारंगधर मंगळे, विजय बाळापुरे, योगेश राउत, उंटवाले, गोपाल गुप्ता, मुर्तिकार गाथे बंधु, राम मानकर, प्रशांत भुईभार, किशोर सावतकर, आकाश उजवणे, प्रतीक तायडे, बबलु बासंबे, ऋषिकेश बडोदे, मयंक गोडसे, अनिल सुरळकर, विनोद बिजवाडे, रविंद्र कुरवाडे,
उमेश बिजवाडे, शंतनु देढे, स्वराज उटांगळे, मयुर विखे, अनिल उजवणे, नंदकिशोर शंकरपुरे, अतुल राउत, प्रविण पिसे, दिनेश सावळे, दिपेश मुंदडा, प्रतीक कट्यारमल, दिलीप राउत, संतोष अढाउ, प्रशांत अढाउ, योगेश बोरडे, गोपाल बुंदेले, सोमेश्वर मोटे शासकीय वसाहत मित्र मंडळ व उजवणे परिवार सह रामदास पेठ मधील अनेक भावीक उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा