Mahatma Gandhi:'प्रभात'ची अन्वी राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

गांधी रिसर्च फाऊंडेशनचे आयोजन : देशभरातून शालेय गटात ७२१ स्पर्धक झाले होते सहभागी 

    national oratory competition 


अकोला: महात्मा गांधी जयंती निमित्त आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाचे औचित्य साधून गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव द्वारा ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थीनी अन्वी जायभाये हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.



या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या गटात देशभरातून ७२१ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रभातची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी अन्वी जायभाये हिने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्चाने श्रोत्यांना मंत्रमूग्ध केले. महात्मा गांधी यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यातून बालकांना पदोपदी बोध घेता येत असल्याचे तिने स्पष्ट केले. 


या स्पर्धेचे तीन फेरीत मुल्यांकन करण्यात आले. प्रथम फेरीत परीक्षकांनी निवडलेल्या भाषणाच्या चित्रफिती युट्यूब तथा अन्य सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या होत्या. त्या चित्रफितीला मिळालेले लाईक्स तथा कॉमेंटस व परीक्षकांनी दिलेल्या गुण या आधारावर अंतीम फेरीसाठी यशस्वी स्पर्धकांची निवड झाली.  


त्यानंतर झालेल्या अंतीम फेरीचे मुल्यांकन डॉ. विश्वास पाटील आणि सुदर्शन अयंगर यांनी केले. या स्पर्धेच्या यशासाठी अन्वीचे पालक डॉ.प्रभाकर जायभाये, डॉ. सुचेता जायभाये व प्रभातचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे तथा यांचे मार्गदर्शन लाभले. 


प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका  वंदना नारे, सचिव निरज आंवडेकर, तज्ज्ञ संचालक कांचन पटोकार, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे तसेच शिक्षकवृंदांनी तिचे कौतुक केले आहे.   

 

 



टिप्पण्या