International:होलोकॉस्टप्रमाणेच इस्लामोफोबियावर बंदी घालण्याची इम्रान खान यांची मागणी

           आंतरराष्ट्रीय घडामोडी


समाजमाध्यमात इस्लामविरोधात नित्य पोस्टचा रतीब सुरू असतो.वाढत्या इस्लामोफोबियामुळे कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळत आहे.यामुळे जगभरात हिंसाचारही वाढीस लागणार आहे.


                                      (फोटो:ट्विटर)





समाज माध्यम (social media) प्लॅटफॉर्मवर इस्लाम बद्दल द्वेष निर्माण करणारे मजकूर पोस्ट करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. या मागणीचे पत्र खान यांनी थेट फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांना पाठविले आहे. 





इम्रान यांनी सोमवारी दुपारी टि्वटवरुन मार्क झकरबर्ग यांना पत्र लिहिल्याची माहिती दिली. मुस्लिमांमध्ये कंट्टरपंथीय भावना वाढीस लागेल. वाढत्या इस्लामोफोबियामुळे कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे जगभरात हिंसाचारही वाढीस लागणार आहे. अशी    शक्यताही इम्रान खान यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.



"होलोकॉस्ट म्हणजे ज्यूंच्या नरसंहाराशी संबंधित कुठलाही मजकुर फेसबुकवर पोस्ट करण्यावर बंदी घालण्याचा तुमचा निर्णय योग्यच आहे, तसेच इस्लामफोबियाशी संबंधित पोस्टवरही बंदी घालावी” अशी मागणी इम्रान यांनी केली आहे.





खासकरुन समाज माध्यमातून या इस्लामफोबियाला चालना मिळत आहे असे इम्रान यांनी मार्क झकरबर्ग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी ते पत्र टि्वटरवर शेअर केले आहे.



इम्रान खान यांनी भारत आणि फ्रान्स या दोन देशावरही जोरदार टीका केली. हे दोन्ही देश मुस्लिमांबद्दल भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारताने सीएए-एनआरसी कायदा लागू केला, त्यामुळे मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. फ्रान्सवरही त्यांनी इस्लामफोबियाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. या पत्राची दखल फेसबुक घेणार का,तर भारत आणि फ्रान्स या दोन देशावर मुस्लिम विरोधक असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला असल्याने,आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा काय परिणाम होतो,हे येत्या काळात दिसेलच.



टिप्पण्या