Indian election: कोविड-19 काळात निष्पक्ष, पारदर्शक व सुरक्षित निवडणुकांकरिता स्टार प्रचारकांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या 40 ऐवजी तीस ठेवावी लागेल. तसेच मान्यताप्राप्त असलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या कोविड-19 च्या काळात वीस ऐवजी 15 असेल. 

Revised guidelines issued for star campaigners for fair, transparent and safe elections in Kovid-19 period  (file photo)



नवी दिल्ली: कोविड-19 काळात सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-19 काळात होणाऱ्या निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावे लागेल, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

 

या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या 40 ऐवजी तीस ठेवावी लागेल. तसेच मान्यताप्राप्त असलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या कोविड-19 च्या काळात वीस ऐवजी 15 असेल. त्याचप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी सादर करण्याचा कालावधी अधिसूचना जारी केल्यानंतर सात दिवसांऐवजी दहा दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्या राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सादर केलेली आहे, त्यांना सुधारित यादी दिलेल्या कालावधीत पुन्हा सादर करावी लागेल. स्टार प्रचारकांच्या सभेसंबंधी परवानगी घेण्यासाठी प्रचाराच्या 48 तास अगोदर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे याची माहिती द्यावी लागेल जेणेकरून सर्व सुरक्षा उपाय वेळेच्या आत करणे शक्य होईल. ही सर्व सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तात्काळ प्रभावाने अमलात येतील.

 

21 ऑगस्ट 2020 रोजी आयोगाने निवडणुका आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या अंतर्गत निवडणुकांच्या काळात कशाप्रकारे मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी याबद्दल निर्देश आहेत. यासाठी राजकीय पक्ष, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली आहेत.

 

निवडणूक आयोगाने बिहार भेटीत सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय राजकीय पक्ष राज्याचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव, (गृह), मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक इत्यादींशी विस्तृत चर्चा केली. यावेळी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन केले जात असल्याचे आयोगाला सूचित करण्यात आले.


टिप्पण्या