- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फैजान अहमद यांचा सॅमसंग कंपनीचा M20 मोबाईल अग्रसेन चौकाजवळ गाडी वरून पडला. ऍड. देवाशिष काकड हे त्या रस्त्याने जात होते, त्यांना तो सापडला.
अकोला: भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड. देवाशिष काकड यांनी प्रमाणिकतेचा व माणूकीचा परिचय देत फैजान अहमद राहणार दीपक चौक यांचा सॅमसंग कंपनीचा हरवलेला मोबाईल परत केला.
हकीकत अशी की, फैजान अहमद यांचा सॅमसंग कंपनीचा M20 मोबाईल अग्रसेन चौकाजवळ गाडी वरून पडला. ऍड. देवाशिष काकड हे त्या रस्त्याने जात होते, त्यांना तो सापडला. ऍड. काकड यांनी सापडलेला मोबाइल रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे आणून हकीकत सांगितली.
रामदासपेठ पोलिसांनी पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एएसआई महेश गावंडे, साहेबराव इंगळे, स्वप्नील खेडकर, संजय जाधव, आकाश जामोदे, वैशाली जाधव, स्वप्नील चौधरी या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून सदर मोबाईल मालकाचा शोध घेऊन ऍड. देवाशिष काकड यांच्या समक्ष मोबाइल फोन फैजान अहमद यांना सुपूर्द केला.
अहमद यांनी भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड. देवाशिष काकड व रामदास पेठचे पोलीस निरीक्षक ठाकरे व त्यांच्या चमूचे यांचे आभार मानले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा