Heavy rain: पुराचे पाणी सोयाबीन गंजीत गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

११ ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस पडला. यामुळे मुख्यतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Heavy rain: Damage caused by flood water soaking soybeans




वाशिम: रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे  मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील अडाण नदीला पूर आला. पुराचे पाणी लखमापूर येथील शेतकरी सतीश दत्तात्रय दबडे व भारत ताटके या शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीत गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.




तालुक्यात ११ ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस पडला. यामुळे मुख्यतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी सतीश दत्तात्रय दबडे यांनी जवळपास १५ क्विंटल सोयाबीनची शेतात गंजी लावली होती. 


परंतू, लगतच्या बोरव्हा येथील अडाण नदीला पूर आल्याने पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले. यामुळे दबडे व ताटके यांच्या शेतात सुद्धा पाणी गेल्याने सोयाबीनची गंजी पूर्णपणे पाण्याखाली गेली व नुकसान झाले. त्यामुळे कृषी विभागाने याचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.



टिप्पण्या