Hathras case: मध्यरात्री पिडीतेवर का केले अंत्यसंस्कार; युपी सरकारने दिले उत्तर…

जिल्हा प्रशासनाने पीडितेच्या आई-वडिलांना सांगितलं की, सकाळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापासून बचावासाठी त्यांनी रात्रीतून कुटुंबियांना अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार केले. 

Why the victim was cremated at midnight;  UP Government answers



दिल्ली: हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये बलात्कार प्रकरणातील सर्वात महत्वाचा  खुलासा करण्यात आला. तो म्हणजे पोलिसांनी पीडित तरुणींच्या मृतदेहावर मध्यरात्रीच अंत्यसंस्कार का केले?



आपल्या प्रतिज्ञापत्रात युपी सरकारने म्हंटले आहे की, जिल्हा प्रशासनाने पीडितेच्या आई-वडिलांना सांगितलं की सकाळी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापासून बचावासाठी त्यांनी रात्रीतून कुटुंबियांना अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार केले. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या प्रकरणाला जातीय आणि धार्मिक रंग दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.


                          ANI ने केेलंल ट्विट


दरम्यान, युपी सरकारने सर्वोच्च न्यायालयात हाथरस प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे समर्थन करताना म्हटले की, यामुळे कोणीही व्यक्तीगत स्वार्थ, खोटं आणि चुकीचे विश्लेषण करु शकणार नाही. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर एका जनहित याचिकेवर उत्तर देताना युपी सरकारने म्हटले की, प्रकरण स्वतंत्र केंद्रीय एजन्सीज कडून तपासणे करणे गरजेचे आहे.



हाथरसच्या एका गावात चार कथित सवर्ण तरुणांनी एका दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या उद्देशानं शारीरिक त्रास दिला. या घटनेनंतर २९ सप्टेंबर रोजी पंधरा दिवसांनंतर गंभीर जखमी असलेल्या पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

टिप्पण्या