Hathras case: हाथरस मधील घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी- रिपाई

या घटनेला आरोपींएवढेच जबाबदार असलेले स्थानिक पोलीस अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर व जिल्हाधिकारी यांच्यावर देखील कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.


Accused in Hathras should be given death sentence



अकोला: उत्तर प्रदेशातील हाथरस मधील घटना अत्यंत निंदनीय असून,या घटनेतील पीडिताला न्याय देण्यासाठी चारही नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देवून, घटनेचा आणि यूपी सरकारचा निषेध केला.



या घटनेला आरोपींएवढेच जबाबदार असलेले स्थानिक पोलीस अधिकारी, उपचार करणारे डॉक्टर व जिल्हाधिकारी यांच्यावर देखील कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने करण्यात आली. 


तत्पूर्वी, अकोला महानगर जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटार सायकल मोर्चा काढण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन पाठविण्यात आले. पीडितेला त्वरित न्याय न मिळाल्यास  तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.


रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे, रिपाइं (आ) महानगर प्रसिद्धी प्रमुख युवराज भागवत, महानगर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाट, पूर्व अध्यक्ष अनिल पहुरकर, वैभव वानखडे, मनोज भालेराव, रोशनी कांबळे, मंगला सिरसाट, निर्मला इंगळे, सुरेखा तायडे, चंद्रकला तायडे, कुसुम दंदी, पदमा दंदी, सुमन क्षीरसागर , शोभा शेगावकर, सुनीता कांबळे , शिला इंगळे, लिला वाहुरवाघ, शोभा गवई , देवका अंभोरे, लविना इंगळे, शालू शेगावकर, कुसुम खंडारे, राजकन्या शिरसाठ, दीपा दांडगे, बेबी दांडगे, माधुरी हिवराळे , बेबी कांबळे, सुर्यकांता कांबळे, लता सरकटे, पद्मा उपरवट , वंदना गवई , गोकर्णा हिवराळे, नलुबाई गोपणारायण, छाया तेलगोटे, सुनीता गायकवाड, मिना गायकवाड, शेवंता हिवराळे, कांता भागवत, फुलवंता वानखडे, उषा वानखडे, सरला गेठे, नंदा पाटील, शोभा गोपणारायण , दुर्गा गवई , मीरा घिरे, आम्रपाली लांडगे, माया तायडे, साधना पालकर, अश्विनी इंगळे, चंद्रकला शिरसाट आदी आंदोलनात सहभागी झाले होते.



टिप्पण्या