Eknaathkhadsencp:अखेर नाथाभाऊ गेले राष्ट्रवादीत;भाजप सोडण्यामागे केवळ फडणवीसचं …

        गल्ली ते दिल्ली राजकारण

"मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या चाळीस वर्षात मी भाजपचे काम केले. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली" असे एकनाथ खडसे म्हणाले.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर यांच्यासारखे कितीतरी नेते होते."

                                       file photo


भारतीय अलंकार 

मुंबई: तब्बल चाळीस वर्ष महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पक्षसाठी  एकनाथ खडसे यांनी आज भाजपला रामराम केला. भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी त्यांचे एकेकाळी घनिष्ठ मित्र असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. "आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून, देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच राजीनामा देत आहोत,"असे खडसे यांनी सांगितले. विनयभंग सारखा गंभीर आरोप करून,आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला असल्याचे खडसे यांनी स्पष्ट सांगितले.


"मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. 

गेल्या चाळीस वर्षात मी भाजपचे काम केले. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली" असे एकनाथ खडसे म्हणाले.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर यांच्यासारखे कितीतरी नेते होते. त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचे काम केले. भाजपने मला अनेक मोठी पद दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजप किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असेही खडसे म्हणाले. 



राजीनामा दिल्यानंतर खडसे भावनिक होवून म्हणाले की, भाजप सरकार मध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीचीही कुणी मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना, मला राजीनामा द्यायला भाग पाडले. माझी तक्रार फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं होते. माझ्यासोबत अत्यंत खोल पातळीचे  राजकारण केले. माझ्या परिवाराला यामुळे भयंकर मनस्ताप सहन करावा लागला.



एवढेच नव्हेतर मी मंत्री असताना माझ्यावर  नऊ महिने पाळतही ठेवली गेली होती. मला काही मिळालं किंवा नाही मिळालं याचं दुख नाही, मी माझ्या ताकतीनं ते मिळवलं, असंही खडसे म्हणाले.


सख्खे मित्र बनले पक्के वैरी


देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे एकेकाळी सख्खे मित्र होते. विधानसभेत एकत्रं बसून, विरोधी पक्षांना धारेवर धरायचे. राज्यातील अनेक महत्वपूर्ण प्रश्न या दोघांनी विधानसभेत मांडले.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेममध्ये प्रवेश करणार आहेत. तर, आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावरून खडसे व फडणवीस यांच्यातील मतभेद किती टोकापर्यंत पोहचले होते, दिसत असले, तरी, एकेकाळी हे दोन्ही नेते खास मित्र होते. 



विनयभंगाचा आरोप मरणा समान


दरम्यान, भाजपाला सोडल्यानंतर  फडणवीस यांच्यावरील नाराजी खडसे यांनी जाहीरपणे व्यक्त केली. खडसे म्हणाले की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली.त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल करणे, कोर्टात ते चालणे यापेक्षा मरण परवडले. मी जेव्हा खटला दाखल करण्या बाबत देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. यासर्व घटनांमुळे मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”. तसेच, फक्त फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडत असल्याचंही खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.



देवेंद्र फडणवीस सरकार


राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून एकनाथ खडसे हे राज्याच्या राजकारणातून हळूहळू बाजूला पडत गेले. भूखंड घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद गमवावे लागले. यानंतर क्लीन चिट मिळाल्यानंतरही त्यांना सरकारमध्ये मात्र स्थान मिळाले नाही. खडसे यांचा त्रास इथच संपला नाहीतर विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता कट झाला. तिकीट मिळाले नाही. विधान परिषदेतही संधी नाकारली. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना स्थान मिळाले मात्र,येथेही खडसे यांना डावलण्यात आले. यामुळे ही शेवटची संधी देखील हुकल्याने अखेर खडसे यांनी पक्षातरांचा निर्णय घेतला.


राष्ट्रवादी की शिवसेना


खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत यावरून सुरुवातीला तर्कवितर्क मांडले गेले. मात्र, ते राष्ट्रवादीतच जाणार असून गुरुवारी मुंबईत एका सोहळ्यात ते प्रवेश करतील, असे सांगितल्या जात होते. आता खडसे यांच्या  कन्या व जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे व इतर सहकारीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जळगावात चर्चा सुरू आहे.



तर खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून त्या भाजपमध्येच राहणार आहेत.  तर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमन आहेत. ‘महानंद’च्या अध्यक्ष म्हणूनही त्या काम पाहतात. जळगाव जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आहे. खडसे यांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश असल्याने भाजपच्या हातून ही संस्थाने जातील,अशी देखील चर्चा जळगावात सुरू आहे.

टिप्पण्या