Dhammchakra: धम्मचक्र प्रवर्तन सोहळा बाबत पोलीस विभाग आणि बौद्ध महासभा, वंचितचे पदाधिकाऱ्यांची बैठक

सेनेचा मेळावा होणार असेल तर आम्ही देखील मिरवणूक काढून जाहीर सभा घेणार 


अकोला: शिवसेना दसरा मेळावा घेणार असेल तर आम्ही देखील धम्मचक्र प्रवर्तन सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करू अशी भूमिका जाहीर केल्याचे पार्श्वभूमीवर पोलीस विभागाचे पुढाकाराने बौद्ध महासभा, वंचितचे पदाधिकारी आणि  उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार यांच्या सोबत आज खदान पोलीस स्टेशनमध्ये बैठक पार पडली.



जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत आम्ही जाहीर केल्या प्रमाणे ह्यावर्षी भारतीय बौद्ध महासभा आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळा निमित्ताने आयोजित मिरवणूक तसेच जाहीर सभा घेण्यात येणार नसल्यावर आम्ही कायम आहोत.

मात्र, सेना खासदार संजय राऊत ह्यांनी दसरा मेळावा पारंपरिक पद्धतीने शिवाजी पार्क वर साजरा होईल, ही बातमी माध्यमातून आल्यावर बौद्ध महासभा तसेच वंचित पदाधिकारी ह्यांनी सेनेचा मेळावा होणार असेल तर आम्ही देखील मिरवणूक काढून जाहीर सभा घेणार असल्याचे पोलीस विभागाला पत्र दिले होते.त्यावर तोडगा काढण्यासाठी आज ही बैठक पार पडली.


इतर कार्यक्रम होणार नसतील आम्ही देखील नियम पाळू मात्र इतरांना कार्यक्रम करण्याची परवानगी मिळत असेल तर मग मात्र परवानगी मिळो की न मिळो धम्मचक्र प्रवर्तन सोहळा व मिरवणूक होईल ह्या वर ठाम असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.


यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कदम, ठाणेदार डी सी खंडेराव  सोबत वंचित प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, महिला प्रदेश महासचिव अरून्धती शिरसाट, भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष पि जे वानखडे, वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, 


महीला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, जि प अध्यक्ष प्रतिभा भोजने, बौध्द महासभा महासचिव एम आर इंगळे,  महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, गजानन गवई, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, विजय जाधव, रमेश गवई ,डि बी शेगावकर, विश्वास बोराडे, किरण पळसपगार, प्रमोद शिरसाट, भाऊसाहेब थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या