Devendra fadanvis:देवेन्द्र फडणवीस यांना कोरोना; स्वतः ट्विट करून दिली माहिती

बिहार विधानसभा निवडणूक मतदान जवळ आले आहे . देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच महाराष्ट्र बाहेर मोठी जबाबदारी दिली होती. 




अकोला: महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी ट्वीट करून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली. संपर्क मध्ये आलेल्या लोकांनी आपली  कोरोना टेस्ट करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कारण बिहार निवडणूक प्रचारात त्यांच्या संपर्कात अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आहेत.




देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे की,  लॉकडाउन काळात रोज सातत्याने  काम करीत आलो आहे. मात्र, आता असे वाटते की,  ईश्वराची इच्छा आहे की मी एक  ब्रेक घ्यावा. त्यांनी म्हंटले आहे की, माझी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला आहे आणि मी आइसोलेशन मध्ये आहे. चिकित्सकांच्या सल्ल्याने मी औषध  उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी कोरोना चाचणी करून घ्यावी.




देवेंद्र फडणवीस अश्यावेळी कोरोना  संक्रमित झाले की, बिहार निवडणूक प्रचार जोमात आला आहे. बिहार विधानसभा निवडणूक मतदान जवळ आले आहे . देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदाच महाराष्ट्र बाहेर मोठी जबाबदारी दिली होती. फडणवीस यांनी नुकतेच बिहार मधील छपरा आणि अन्य ठिवणी निवडणूक रॅलीत मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) चे अनेक नेते  फडणवीस यांच्या सोबत होते.


मे महिन्यापासून म्हणजेच कोविड काळात आतापर्यंत त्यांचे राज्यातील सुमारे ४७ ठिकाणी फडणवीस यांचे दौरे झाले आहेत.  फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले आहे.

टिप्पण्या