declare Bird Week:पक्षी सप्ताह जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य; ५ ते १२ नोव्हेंबर कालावधीत सप्ताह होणार साजरा

महाराष्ट्र हे पर्यावरणप्रेमी व निसर्गाला दैवत मानणारे राज्य आहे. ३९ वर्षांपासून राज्यात पक्षी संमेलन होत आहे. पक्षी संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, आतापर्यंत या उपक्रमाना शासन स्तरावर कोणतीही मान्यता नव्हती. पाठबळही नव्हते.

Maharashtra is the first state in the country to declare Bird Week;  The week will be celebrated from 5th to 12th November (photo:Chandrakant Patil)




भारतीय अलंकार

मुंबई: भारतीय पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे. अधिकृतरीत्या पक्षी सप्ताह जाहीर करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे, हे येथे उल्लेखनीय.



मारुती चितमपल्ली यांनी वनखात्याची प्रदीर्घ सेवा केली. या सोबतच ‘पक्षिकोष’ व २२ पुस्तकांच्या माध्यमातून निसर्ग सामान्य माणसापर्यंत पोहोचविला. भारतीय पक्षी शास्त्राचे जनक  डॉ. सलीम अली यांनी ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड’ व इतर माध्यमांतून पक्ष्यांचे विश्व उलगडलेले आहे. त्यांच्या साहित्यामुळे पक्षी निरीक्षण आणि संशोधनाची चळवळ उभी राहिली. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस ५ नोव्हेंबरला, तर  डॉ. सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. योगायोगाने  दोघांच्याही जन्मतारखेत एक सप्ताहाचे अंतर आहे. त्यातही आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाचा काळ  असतो. यामुळे शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षी संवर्धनाची चळवळ अधिक मजबूत होईल, असा विश्वास  अकोलकर पक्षी मित्रांनी व तज्ञानी व्यक्त केला.   



राज्य वन्यजीव मंडळाच्या १५व्या बैठकीत मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हा विषय मांडला होता. त्याला मंडळाचे  सदस्य किशोर रिठे, कुंदन हाते यांनी अनुमोदन दिले होते. मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांनीही सदस्यांना या निर्णयाबाबत आश्वस्त केले होते. त्यानुसार या निर्णयावर शासनाने अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केले.


राज्यात ४५० प्रजातींचे पक्षी

        (Photo:Chandrakant Patil)


राज्यात सुमारे ४५० प्रजातींचे पक्षी आढळतात. देशात सुमारे १२८ हून अधिक आणि महाराष्ट्रात ६४ वेगवेगळ्या प्रजातींचे विदेशी पक्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत विविध तलाव आणि नद्यांभोवती  येतात. गेल्या काही वर्षांत स्थलांतरित पक्ष्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. पाणथळांवरील अतिक्रमणाने या पक्ष्यांचा अधिवास कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षी सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करण्यात येणार आहे.



राज्यात ३९ वर्षापासून चळवळ उभी

          (photo:Chandrakant Patil)


महाराष्ट्र हे पर्यावरणप्रेमी व निसर्गाला दैवत मानणारे राज्य आहे. ३९ वर्षांपासून राज्यात पक्षी संमेलन होत आहे. पक्षी संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. मात्र, आतापर्यंत या उपक्रमाना शासन स्तरावर कोणतीही मान्यता नव्हती. पाठबळही नव्हते. आता मात्र, या शासन निर्णयामुळे पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पक्षी संवर्धन व पक्षिमित्रांच्या संपूर्ण चळवळीला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे,एवढे निश्चित.

टिप्पण्या