Dagadparva dam:दगडपारवा धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या शेख दानिशचा मृत्यू

संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी २० मिनिटात २५ ते २८ फुट खोल पाण्यातुन शोधुन काढला मृतदेह.

Death of Sheikh Danish who went down to swim in Dagdaparva dam





भारतीय अलंकार

अकोला: बार्शीटाकळी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दगडपारवा धरणावर सोमवारी  तीन तरुण अकोला शहर येथून सहलीला गेले. दुपारी दोन-अडीच वाजताच्या दरम्यान तिघांनी धरणात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी उडी मारली. मात्र, पाण्याच्या खोलीच्या अंदाज नसल्याने तरूण पाण्यात बुडू लागले, यामधून दोन तरुण कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झाले. परंतू, २२ वर्षीय शेख दानिश अब्दुल नईम याचा दुर्दैवाने यात मृत्यू झाला. मृतक दानिश याचे वडील अकोला पोलिस विभागात वाहतूक शाखेत वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. मृतक दानिश हा मनमिळावू व अभ्यासात हुशार होता.


अशी घडली घटना


सविस्तर घटना अशी की, गंगानगर येथील रहिवासी २२ वर्षीय शे.दानिश शे.नईम  हा युवक आपल्या दोन मित्रांसह दगडपारवा धरण (बार्शीटाकळी) येथे सोमवारी गेला. दुपारी तिघेही धरणात पोहण्यासाठी उतरले. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे पाण्यात बुडू लागले. त्यापैकी दोघे स्वतःला वाचवत कसेबसे पाण्याबाहेर आले. मात्र,वर आल्यानंतर दानिश दिसला त्यांना नाही. दानिश बेपत्ता असल्याचे दिसून येताच या घटनेची माहिती बार्शिटाकळीचे ठाणेदार तीरुपती राणे यांना दिली. त्यांनी लगेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना या घटनेची माहिती दिली. लगेच सर्च ऑपरेशनसाठी पाचारण केले. 



क्षणाचाही विलंब न करता जीवरक्षक दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी उमेश बिल्लेवार,सागर आटेकर, अंकुश सदाफळे, धिरज राऊत, मयुर कळसकार, सुरज ठाकुर, ओम साबळे, मयुर सळेदार, शिवम वानखडे  सर्च ऑपरेशन साहीत्य घेऊन घटनास्थळी पोहचले. 


जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी घटनास्थळ ट्रेस केले. २५-३० फुट खोल पाणी असल्याने लगेच अंडर वाॅटर सर्च ऑपरेशन चालु केले. तेव्हा अंडर वाॅटर सर्च ऑपरेशनसाठी पाण्यात असलेले जिवरक्षक दीपक सदाफळे, धिरज राऊत, अंकुश सदाफळे, उमेश  बिल्लेवार यांच्या पैकी अंकुश सदाफळे याला मृतदेह बुडाशी असल्याचा स्पर्श झाला. क्षणार्धात दीपक सदाफळे यांनी अंडर वाॅटर जंप घेऊन बुडाशी असलेला मृतदेह वर आणला. मृतदेह पाण्या बाहेर काढत असताना मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोडला होता.


                                     बचाव पथक

घटनास्थळी ठाणेदार तीरुपती राणे आणी पोलीस कर्मचारी तसेच अकोला ट्रॅफिक पोलीस टीम आणि नातेवाईक हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. बार्शीटाकळी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 


टिप्पण्या