- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शना नुसार कोविड प्रादुर्भाव आजच्या काळात आपले आरोग्य जपण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपायाचे नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्यात गावागावात प्रचार रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
अकोला,दि.२: माझे कुटुंब माझी जबाबदारी या महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत आपली रोगप्रतिकारक क्षमतेला वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहे. पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून व जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड रोग प्रतिकार शक्ती पंधरवाडाचे आयोजन दि. २ ते १५ ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यात करण्यात येणार आहे. यासाठी जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाचे उदघाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, प्रसार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी, लेखाधिकारी व दीपक मळखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
पालकमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शना नुसार कोविड प्रादुर्भाव आजच्या काळात आपले आरोग्य जपण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदिक उपायाचे नागरिकांना माहिती व्हावी, यासाठी जिल्ह्यात गावागावात प्रचार रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी आपले आरोग्य जपण्यासाठी करावयाच्या उपाय योजना संबंधी माहिती देण्यात येणार आहे . कोविडच्या प्रादुर्भाव काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार पद्धती घ्यावी याबाबतची माहिती लोकांना या प्रचाराद्वारे देण्यात येणार आहे.
आयुष मंत्रालय, आयुष संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याद्वारे हे आयुर्वेदिक उपाय करण्यात आलेले आहे, तरी नागरिकांनी या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा व आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या उपाययोजनांचा दैनंदिन जीवनात वापर करावा. तसेस प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी नागरिकांनी आयुष संचालनालय सांगितलेल्या काढ्याचे सेवन करावे, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.
आशा सेविका द्वारे रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता करावयाच्या उपाय योजना यासंबंधीची घडी पुस्तिकाचे वितरण करण्यात येणार आहे. या घडी पुस्तिकेचे विमोचन यावेळी करण्यात आले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा