अकोल्यात 1251 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोना संक्रमण काळात बधितांची संख्या वाढत आहे.त्याच बरोबर पूर्णपणे बरे होणाऱ्याचे प्रमाणही समाधान कारक आहे.
अकोला,दि.1: कोरोना समूह संक्रमणाचा काळ सध्या सुरू आहे.अकोल्यात दिवसा गणिक कोरोना पसरत आहे.पण त्यावर मात करण्यासाठी अकोला आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7525 एवढी आहे. त्यातील 239 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6035 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1251 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 218 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 198 अहवाल निगेटीव्ह तर 20 अहवाल पॉझिटीव्ह आले. तसेच आज तीन मयत झाले.
त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 7525(6158+1212+155) झाली आहे. आज दिवसभरात 161 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 39270 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 38298, फेरतपासणीचे 208 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 764 नमुने होते. आजपर्यंत एकूण 38441 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 32283 तर पॉझिटीव्ह अहवाल 7525(6158+1212+155) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 20 पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व 16 पुरुष आहे. त्यातील अकोट येथील तीन जण, बोर्डी ता. अकोट येथील दोन जण, तर उर्वरित केशवनगर, मोठी उमरी, शाहापूर, गीतानगर, कैलासनगर, किर्ती नगर, जीएमसी, जूने शहर, चिखलगाव, पातूर, राधाकिशन प्लॉट व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
तसेच आज सायंकाळी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुष आहे. त्यातील राजाराम नगर कौलखेड, देवी खदान व गीता नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 23 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
तीन मयत
दरम्यान तीन जणांचे मृत्यू झाले. अंबिका नगर, अकोला येथील 68 वर्षीय पुरुष असून तो 18 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला, तापडीया नगर येथील 73 वर्षीय पुरुष असून ते 29 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर आदर्श कॉलनी येथील 75 वर्षीय पुरुष असून ते 26 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
161 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून 18 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 11 जण, ओझोन हॉस्पीटल येथून एक जण, युनिक हॉस्पीटल येथून तीन जण, तर होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले 128 जणांना, अशा एकूण 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
1251 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 7525(6158+1212+155) आहे. त्यातील 239 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 6035 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1251 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 184 चाचण्या झाल्या त्यात 24 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
रॅपिड टेस्ट
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण व पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 15 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बार्शीटाकळी येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बाळापूर येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे आठ चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे दोघांचे चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 50 चाचण्या झाल्या त्यात 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, 69 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 33 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे दिवसभरात 184 चाचण्यांमध्ये 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 17625 चाचण्या झाल्या त्यात 1267 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा