Corona update आज १६ पॉझिटिव्ह ; १मयत

             *कोरोना अलर्ट*

*आज  बुधवार दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-१६१*
*पॉझिटीव्ह-१६*
*निगेटीव्ह-१४५*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात सात महिला व नऊ पुरुष आहेत. त्यातील मूर्तिजापूर, मलकापूर, तापडिया नगर व पारध ता. मूर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जठारपेठ, न्यू भीमनगर, लेबर कॉलनी, गजानन नगर, गांधीग्राम, वरूर जाऊळका ता.अकोट, आळेगाव  ता. पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.


दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात कृषी नगर , सिव्हील लाईन येथील ४३ वर्षीय महिला असून तो दि. २४ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर  दहीहंडा येथील ६५ वर्षीय पुरुष असून तो दि. २६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. 


काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह अहवाल संख्यात व दाखल रुग्ण संख्येत करण्यात आला आहे. यांची कृपया नोंद घ्यावी.


*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-६२७०+१२८२+१५५=७७०७*
*मयत-२४८*
*डिस्चार्ज- ६६०९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ८५०* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या