corona mask: मास्क लावून मुस्लिम नवदाम्पत्याने केला निकाह; कोरोना नियमांचे पालन करून पाडला नवा पायंडा

डॉ इर्शाद हुसैन यांनी कोरोना महामारीत  मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेअठरा हजार रुपये


अकोट : कोरोना प्रादुर्भाव मार्च पासून संपूर्ण देश व जगात झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढला होता. तेंव्हा पासून केंद्र व राज्य शासनाने पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता कोरोना प्रादुर्भाव शासन व जनतेच्या सहकार्याने कमी होतांना दिसत आहे. 

अशातच भाजपा अल्पसंख्यक मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मोहिब ठेकेदार यांची पुतणी व माजी सरपंच सलीमभाई यांची मुलगी डॉ अफरीन सबा यांचा विवाह डॉ सै इरशाद हुसैन यांचेसोबत पार पडला. विशेषता अशी की, बाळापूर तालुक्यातील निंबा गावाचे रहिवासी असलेले डॉ इर्शाद हुसैन यांनी त्यांचे विवाह सोहळयात शासनाने दिलेल्या अटी शर्तीचे नियम पाळुन सर्वांना  सर्वाना आधी मास्क व सॅनिटाईझर वाटप करून एक आदर्श निर्माण करून अगळा वेगळा प्रकारचा विवाह सोहळा अकोट येथे पार पडला. 


यामध्ये हिन्दू  समाजातील लोकांनी सुध्दा सहभाग घेतला होता. अश्या प्रकारचा कोरोना आजार पासून बचाव व्हावे याकरिता डॉ इर्शाद हुसैन व डॉ अफरीन सबा यांचे दोन्ही परिवारातील प्रत्यकांनी मास्कचे वापर करून ऐकामेकांचे सोबत भेट घेतली असून शुभेच्छा दिल्या.


डॉ इर्शाद हुसैन हे बी ए एम एस .सीसीएच असून निंबा येथे फॅमिली केअर क्लीनिक आहे डॉ इर्शाद हुसैन यांनी भर कोरोना महामारीत आपल्या गावात प्रशासन सोबत राहुन कोरोना प्रादुर्भाव कसे प्रकारचे कमी व्हावे, यासाठी त्यांनी स्वत कोरोना जनजागृती संदर्भात स्टिकर वाटप केले.
कोरोना महामारीत त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अठरा हजार रुपये देण्याचे कार्य केले.


निंबा ग्राम पंचायतने वार्दळच्या ठिकाणी सरपंच पोलीस पाटील यांच्यासोबत सेनिटाइजर मशीन वाटप करण्यास सहकार्य केले. डॉ अफरीन सबा हे अकोला ऑरबीड हॉस्पिटल येथील आरएमओ म्हणून चांगली सेवा देतात. 


अश्या या कार्यक्रमाची सर्वांनी प्रेरणा घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावे या विवाह सोहळयात नवदाम्पत्याने शासनाचे नियम पूर्णपणे पार पाडले याबद्दल सर्व स्तरावरुन त्यांचे भरभरून कौतुक करीत आहे अशी माहिती पत्रकार सय्यद अहमद यांनी दिली


टिप्पण्या