Corona death:कोरोनाने मृत्यू पावलेले पोलीस खेडकर यांच्या कुटुंबियास आठ लाखाचा धनादेश प्रदान

सामाजिक कार्यकर्ते व विमा अभिकर्ते अजय शर्मा तथा मुकुटबिहारी शर्मा ही जोडगोळी महानगरात फिरून सेवाभावी पणे कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना विमा व अन्य आर्थिक लाभ अगदी मोफतपणे कोणताही मोबदला न आकारता करीत आहेत.

अकोला:  पोलीस मुख्यालय येथे कर्तव्यावर असताना करोनाने मृत्यू पावलेल्या शिवाजी नगर येथील रहिवाशी हेड पोलीस कॉन्स्टेबल राजू  खेडकर यांच्या कुटुंबीयास त्यांची जीवन विमा पॉलिसीची देय रक्कम रुपये ८ लाख ७८ हजार रुपये त्यांच्या पत्नीस प्रदान करण्यात आली.


सामाजिक कार्यकर्ते व विमा अभिकर्ते अजय शर्मा तथा मुकुटबिहारी शर्मा ही जोडगोळी महानगरात फिरून सेवाभावी पणे कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना विमा व अन्य आर्थिक लाभ अगदी मोफतपणे कोणताही मोबदला न आकारता करीत आहेत. 

शर्मा यांना खेडकर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी त्यांचे कुटुंबीय व पोलीस अधीक्षक यांचेशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनात विमा कार्यालयाशी पाठपुरावा करून स्व.खेडकर यांच्या कुटुंबियांना विमा लाभ मिळवून दिला.


पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी हा धनादेश वितरण कार्यक्रम झाला.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या हस्ते तथा जीवन विमा निगम चे व्यवस्थापक मिलिंद कुलकर्णी, नितीन लोया, विकास अधिकारी अभय धुरटकर, पोलीस हेड क्वार्टर येथील राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुलसुंदरे यांच्या उपस्थितीत  पोलीस कर्मचारी स्व.खेडकर यांच्या पत्नी तेजीस्विनी राजू खेडकर व त्यांची आई यांना रुपये आठ लाख अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.


शर्मा यांनी हा सेवाभावी उपक्रम सुरू करून संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याचे कार्य हे कौतुकास्पद आहे.जेथे नागरिकांना आपल्या हक्काचे पैसे प्राप्त करण्यासाठी अनेक कागदपत्राची जुळवा जुळव करावी लागते. तेथे यांनी त्वरित हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले, ही प्रशंसनीय बाब असल्याचे एस पी श्रीधर यांनी सांगून या सेवाभावी उपक्रमास आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.


सामाजिक अंतर राखीत झालेल्या या उपक्रमात यावेळी अजय शर्मा, मुकुटबिहारी शर्मा समवेत पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या