- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यावेळी वंचितचे कार्यकर्ते झाडाला मिठी मारून उभे राहिले, तर कुणी झाडावर चढून बसले. वृक्ष तोडण्यासाठी आलेल्याना अश्या प्रकारे कार्यकर्त्यानी विरोध केला.
भारतीय अलंकार
अकोला: रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अकोला ते बार्शीटाकळी या रस्त्याच्या कडेला सुमारे शंभराहून अधिक आयुष्य असलेली सुमारे १८०० जुने वृक्ष तोडण्यास सुरुवात झाली आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ही बाब समजताच त्यांनी कान्हेरी सरप येथे जावून,सुरू असलेली वृक्ष तोड थांबविण्यासाठी चिपको आंदोलन केले. वंचितने आज केलेल्या आंदोलनामुळे तीन चार दशकापूर्वी अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात झालेल्या चिपको आंदोलनाची उस्थितांना प्रकर्षाने जाणीव झाली.
रस्ता रुंदीकरण करण्याच्या नावावर ही मोठी वृक्षतोड होत असून, त्या विरोधात आज २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पासून वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने प्रदेश पदाधिकारी राजेंद्र पातोडे, डॉ धैर्यवर्धन पुंडकर, अरुंधती सिरसाट यांच्या नेतृत्वात वृक्षतोड थांबविण्यासाठी व वृक्ष वाचविण्यासाठी " चिपको आंदोलन " करण्यात आले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते झाडाला मिठी मारून उभे राहिले, तर कुणी झाडावर चढून बसले. वृक्ष तोडण्यासाठी आलेल्याना अश्या प्रकारे कार्यकर्त्यानी विरोध केला.
दरम्यान, तहसीलदार गजानन हमद आणि पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी मध्यस्थी करून आंदोलकांचे म्हणणे जाणून घेतले. सध्या वृक्षतोड थांबविण्यात आली असून, वरिष्ठांशी चर्चा केल्यावर पुढील निर्णय होणार असल्याचे कळते.
"रस्ते विकास महामंडळ,बी अँड सी आणि संबंधित विभागाने,जुने वृक्ष तोडण्याआधी नवे वृक्षारोपण करून किमान वर्षभर तरी जगवावे.त्यानंतर वृक्षतोड करावी. काल पासून मंगरुळपीर मार्गावर वृक्ष तोडण्यास प्रारंभ झाला आहे. रस्ते विकास नावाखाली वृक्षतोड करू नये.वृक्षतोड थांबविण्यात आले नाहीतर,वंचितच्या वतीने येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.यामुळे नागरिकांना होणाऱ्या असुविधासाठी संबंधित विभाग जबाबदार राहतील." राजेंद्र पातोडे
अकोला ते महान सुमारे ९०० झाड आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने झाडे वाचविणे आवश्यक आहे,असे यावेळी आंदोलकांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,
जिल्हाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ प्रदिप वानखडे, प्रभा शिरसाट, राजकुमार दामोदर, सचिन शिराळे यांच्या मार्गदर्शनात वंचितचे सर्व जिल्हा, तालुका, सर्कल, ग्रामशाखा, महिला आघाडी, सम्यक, युवक पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा