chain fast: विवाह संघर्ष समितीने थाटले जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुकाने; तीन दिवसीय साखळी उपोषणाला प्रारंभ

कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे विवाह सोहळ्यात सेवा बजावणाऱ्या कामगारांचे व्यावसायिक नुकसान होत आहे. हा वर्ग आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यात असंतोष पसरला आहे.


अकोला : अनलॉक ५ मध्ये अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे, मात्र विवाह आणि मंगल प्रसंगांत सामील होणाऱ्यांच्या संख्येत अद्यापही बदल करण्यात आला नाही. विवाह संबंधी व्यवसाय करणाऱ्या लाखो लोकांवर आर्थिक संकट आले आहे. विवाह प्रसंगात उपस्थितांची संख्या वाढवावी, या मागणीसाठी अकोल्यातील विवाह संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीन दिवसीय उपोषण सुरू केले आहे. आज समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विवाह करिता आवश्यक साहित्य मंडप सजावट , फुल सजावटी आदींची दुकाने थाटली.




शासनाने लॉन्स, मंगल कार्यालय व विवाह सोहळ्यांच्या वराती उपस्थितीच्या अतिरिक्त संख्येला परवानगी नाकारली आहे.यामुळे अनेक क्षेत्रातील परंपरागत व्यावसायिक व कामगार वर्गाच्या उदर निर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.अनलॉक प्रक्रियेत सर्व क्षेत्रांना मोकळीक दिली जात आहे. चित्रपटगृहांना सुध्दा शासन परवानगी देत आहे. परंतू, लग्न सोहळ्यांना परवानगी नाकारली आहे.या निषेधार्थ विवाह संघर्षा सेवा समितीच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे.



आंदोलनात टेंट डेकोरेशन असोसिएशन, लॉन्स, मंगल कार्यालय असो, इवेंट मॅनेजमेंट असो, फ्लावर डेकोरशन असो, साऊंड अँड लाइट असो, फॉटोग्राफर असो, वेडिंग प्रिंटिंग असो, बँड असो, घोडी बग्गी असो, ब्राह्मण संगटन समवेत सर्व वर्गाच्या संस्था व संघटना सहभागी झाल्या आहेत.

सोमवारपासून सुरू झालेल्या तीन दिवशीय साखळी धरणे आंदोलनात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितिन देशमुख, माजी महापौर विजय अग्रवाल, महापौर अर्चना म्हसने, मनपा विरोधी पक्ष नेते साजिदखान पठाण, नगरसेवक राजेश मिश्रा, जी.प सदस्य गोपाल दातकर, ऍड पप्पू मोरवाल, वंचित बहुजन आघाडीचे  सुरेश पाटकर, प्रमोद डेंडवे,गजानन गवई, रणजीत वाघ, सुरेन्द्र तेलगोटे, सरला मेश्राम आदींनी पाठिंबा दिला आहे.



दरम्यान केटरिंग असो, साऊंड अँड लाइट असो, तथा वेडिंग पत्रिका असोचे ,फॉटोग्राफर असो, एकता घोडी असो, एकता बैंड असोचे पदाधिकारी  टप्याटप्याने उपोषण आंदोलनात सहभागी होणार आहेत. या तीन दिवशी साखळी धरणे आंदोलनात शारीरिक अंतर राखून संस्था व संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन विवाह संघर्ष सेवा समितीचे दादासाहेब उजवणे, संजय शर्मा, हेमंत शाह, निखिलेश मालपाणी, दर्शन गोयंका, कृष्णा राठी, संदीप निकम, सुरेन्द्र नायसे, सुनील कोरडिया, गुड्डू पठाण, पंडित शिवकुमार शर्मा, गजानन दांडगे, किरण शाह, भैयासाहेब उजवणे, योगेश कलंत्री, संदीप देशमुख, मंगेश गीते, बाबू बागडे, कमलेश कोठारी, नितिन देशमुख, नीरज भांगे, संजय सिसोदिया, राजू गाडगे, योगेश शेगोकार यांनी केले आहे.



टिप्पण्या