- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राजकारण: गल्ली ते दिल्ली
पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपाने नऊही बंडखोर नेत्यांवर कारवाई केली.
Bihar elections: 9 BJP rebel leaders expelled from the partyपटना: बिहार विधानसभा निवडणूक हळूहळू रंगात येत आहे.आता पर्यंत जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपा पक्षाने सुध्दा उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्या नंतर पक्षात बंडखोरी उफाळली. यात ९ नेत्यांचा समावेश आहे. या नऊ नेत्यांनी एनडीएच्या उमेदवारांविरोधातच दंड थोपटले. त्यामुळे भाजपाने या नऊही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कडून उमेदवारांची घोषणा केली. भाजपा सोबत यावेळी जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक लढवत आहेत. मात्र, एनडीएतील जागा वाटपात अनेक जागा जदयू व मित्र पक्षांकडे गेल्याने भाजपातील इच्छुक नेते नाराज झाले.
नाराज झालेल्या नेत्यांनी बंडखोरी सुरू केली. मग एनडीए उमेदवारां विरोधातच उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपाने नऊही बंडखोर नेत्यांवर कारवाई केली.
नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. यात राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया, उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल शेखर, अजय प्रताप या नेत्यांचा समावेश आहे. बिहार प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल यांनी याबाबतचा आदेश १२ ऑक्टोबर रोजी जारी केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा