- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा विचार महत्त्वाचा - बच्चू कडू
अकोला, दि.१: गावोगावी रुग्णवाहिकेची गरजच पडू नये अशी व्यवस्था निर्माण होणे आज गरजेचे असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. आज राज्यामध्ये सार्वजनिक विचारातून काम झाले पाहिजे जेणेकरून सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी स्वीकारत नियमांचे पालन करून कोरोनाची लढाई जिंकनेही महत्त्वाचे आहे.
परंपरेतून खूप काही करता येतं याचं उत्तम उदाहरण आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांचे वडील स्मृतीशेष रामकृष्ण आप्पाजी मिटकरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीसाठी रुग्णवाहिका लोकार्पणातून दिसून येते. आज देशात मंदिरे उभारण्यापेक्षा शाळा अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. ते स्मृतीशेष रामकृष्ण आप्पाजी मिटकरी पुण्यस्मरणानिमित्त रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे सदस्य आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, गोदावरीबाई मिटकरी उपस्थित होते.
यावेळी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांना शहीद हेमंत करकरे विरता पुरस्कार, शिक्षक मुकुंद मोरे व गोपाल मोहे यांना ज्योती-सावित्री पुरस्कार, डॉ.निलेश वानखडे यांना कोविडयोद्धा तर पत्रकार विशाल बोरे याना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा