Baby Kits: एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत बेबी किट्सचे वाटप

जन लोकशाही संघठनचे सैय्यद नासीर यांचे हस्ते अंगणवाडी केंद्र क्र ९०  मध्ये  करण्यात आले वाटप. 



अकोला: एकात्मिक बाल विकास  कार्यालय अकोला अंतर्गत अंगणवाडी केंद्रा अंतर्गत नवशिशुंसाठी संपूर्ण 'बेबी किट्स' चे वाटप करण्यात आले. यामध्ये बाळाच्या उत्तम आरोग्य व  विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंचा समावेश आहे.



अंगणवाडी केंद्राच्या वतीने परिसरातील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यांना वेळेवर औषध उपचार करून  बाळंतपण सुखरूप व्हावे तसेच नव्याने जगात आलेल्या  बाळाची यथायोग्य काळजी घेतली जावी आणि जन्मापासून सज्ञान होईपर्यंत वेळच्यावेळी लसीकरण करणे, यासोबतच त्या बाळाची काळजी घेतली जावी, यासाठी कार्यालया अंतर्गत  बेबी किट्स वाटप केले जाते.  



या उपक्रमाअंतर्गत प्रभाग क्रमांक १ अकोटफाईल भागातील  अंगणवाडी केंद्र क्रमांक ९० मध्ये अंगणवाडी सेविका  रंजना सूर्यवंशी व मदतनीस पंचफुला पाटील यांच्या उपस्थितीत जन लोकशाही संघठनचे संस्थापक अध्यक्ष सैय्यद नासीर यांचे हस्ते करण्यात आले. 


यावेळी पत्रकार सैय्यद ज़मीर ,समीरोद्दीन, हाजी एहतेशाम, समीर खान,सैय्यद ज़ाहिर आणि प्रभागातील महिला उपस्थित होत्या .



टिप्पण्या