Avinash kharshikar: 'माफीचा साक्षीदार' काळाच्या पडद्याआड; जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन

तुज आहे तुज पाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासुची सासु ,माफीचा साक्षीदार ही त्यांची गाजलेली नाटक नुसतच गाजली नाहीतर दमदार अभिनयाने अजरामर केली.

'Witness the apology' behind the curtain of time;  Veteran actor Avinash Kharshikar passes away( file photo)




भारतीय अलंकार

ठाणे: मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे आज सकाळी १० च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता समाज माध्यमा द्वारे त्यांच्या निकटवर्तीयानी दिली.


राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी,

"ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच्या दुःखद निधनाची वार्ता समजली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते आपण गमावले आहेत.", अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



मराठी रंगभूमी, मालिका व चित्रपट क्षेत्रातील बहुआयामी अभिनेते अविनाश खर्शीकर यांचे निधन हे मराठी रसिकांच्या मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मराठी कलाविश्वाला अविनाश खर्शी कर यांचे कार्य सदैव स्मरणीय राहील.



रंगभूमीवर मनसोक्त रमलेले अभिनेते

                               संग्रहित छायाचित्र


अविनाश खर्शिकर रंगभूमीवर मनसोक्त रमलेले अभिनेते होते. चल गंमत करु, दे टाळी, डोक्याला ताप नाही, माझा छकुला, किस बाई किस, राणीनं डाव जिंकला, येडा का खुळा, रणांगण या मराठीसह 'कानून ' या हिंदी चित्रपटातही भूमिका त्यांनी दमदार भूमिका केली. 


अजरामर 

                              संग्रहित छायाचित्र

मराठी हिंदी टीव्ही मालिका चित्रपटांपेक्षा  रंगभूमीवर ते जास्त रमले. तुज आहे तुज पाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासुची सासु ,माफीचा साक्षीदार ही त्यांची गाजलेली नाटक नुसतच गाजली नाहीतर दमदार अभिनयाने अजरामर केली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मराठी,हिंदी चित्रपट ,नाट्य सृष्टीसह राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमित देशमुख,  दिलीप ठाकूर, नीलिमा कुळकर्णी आदींनी श्रद्धांजली वाहिली.





टिप्पण्या