AkolaMnc: महापालिका सर्वसाधारण सभेत राडा; नगरसेवक शशी चोपडे निलंबित Rada at the municipal general meeting; Corporator Shashi Chopde suspended

कोविड-19 परिस्थितीमुळे आजची सभा महापालिका आवारात पेंडाल टाकून घेण्यात आली होती.



अकोला:  महानगर पालिकेच्या आजच्या सर्वसाधारण महासभेत ११ विषयांवर चर्चा होणार होती. मात्र,दरवेळी प्रमाणे याही वेळी राडा झाल्याने,सभा फिस्कटली. यासर्व गोंधळात शिवसेनेचे नगरसेवक शशी चोपडे यांनी पेंडाल  पडण्याचा प्रयत्न केला. शशी चोपडे यांना पुढील दोन सभेसाठी निलंबित करण्यात आले.



मागील दोन सभेत विषयांवर चर्चा न करता सत्ताधारी भाजपने विषय मंजूर केला असल्याचा आरोप करीत भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. 



यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर सभागृहात योग्य उत्तर न मिळाल्याने शिवसेनेचे राजेश मिश्रा यांनी सभागृहात गोंधळाला सुरुवात केली. त्यांनी  सभागृहात थेट डेस्क व माईकची फेकफाक करून तोडफोड केल्याने एकच  गोंधळ उडाला.


तर सत्ताधारी भाजपने कोणत्याच विषयांवर सभागृहात चर्चा केली नाही, असे म्हणत विरोधकांनी गोंधळ घातला. कोविड-19 परिस्थितीमुळे आजची सभा महापालिका आवारात पेंडाल टाकून घेण्यात आली होती. या संपूर्ण गोंधळात संतापलेल्या शिवसेनेच्या नगरसेवक शशी चोपडे यांनी पेंडाल पाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर शशी चोपडे यांना पुढील दोन सभेसाठी निलंबित करण्यात आले.तर विरोधकांनी सभा त्याग केला.





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा