Akola crime: मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने बोलाविले अन लुटून नेले सोने...१२ तासाच्या आत पोलिसांनी तिघाना ठोकल्या बेड्या

चेन्नई येथील जैन कुटुंबाची झाली फसवणूक





अकोला: चेन्नईहून अकोल्यात आपल्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी आलेल्या कुटुंबाला मारहाण करून त्यांना लुटण्याची घटना अकोल्यात घडली. मात्र, पोलिसांनी काही तासातच आरोपींनी लुटलेला मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे. 


अकोल्यातील एमआयडीसी परिसरातील काही युवकांनी सापळा रचून मुलगी दाखवण्याच्या बहाण्याने तामिळनाडू येथील जैन कुटुंबियांना अकोल्यात बोलविले होते. कुटुंब अकोल्यात मुलगी पाहण्यासाठी आले असता, येथील काही युवकांनी त्यांना निर्मनुष्य जागी नेवून मारहाण करून त्यांच्याकडील सोने व मोबाइल लुटले. लुटण्यात आलेला मुद्देमाल सुमारे अकरा लाखांचे असल्याचे पोलिसांनी म्हंटल आहे.  या घटनेमुळे पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याच मोठं आव्हान उभं होते. 


कारण, आरोपींच्या बद्दल कोणतीही माहिती पोलिसांकडे उपलब्ध नव्हती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच या आरोपींना बेड्या ठोकल्या . यामध्ये पोलिसांनी एका दिवसात कुठलाही सुगावा नसताना तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच लुटलेला मुद्देमाल ही जप्त केला आहे. या तपासात स्थानिक गुन्हे शाखेची महत्वाची भूमिका बजावली आहे.




मुलगी दाखविण्याच्या बहाण्याने अकोल्यातील एमआयडीसी परिसरात घेवून जावून चेन्नई येथील निवासी दिलीप जैन यांच्याकडील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची फिर्याद त्यांनी मंगळवार .28 ऑक्टोबर रोजी रामदासपेठ पोलिस ठाण्यात दिली होती. 


याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी तपास चक्रे फिरवीत अवघ्या बारा तासात अमरदीप पाटील, अमोल मोरे आणि अभिजित इंगोले अश्या तीन आरोपीना अटक केली असून,  आरोपिंकडून १० लक्ष रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेली बाईक देखील जप्त केली.


ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर , अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ , सपोनि नितीन चव्हाण , जयंता सोनटक्के, अश्विन मिश्रा , किशोर सोनोने , वसीम शेख , शक्ती कांबळे , तर सायबर सेलचे प्रशांत संदे , गणेश सोनोने यांनी केली. 

 

अलीकडे अश्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत.नागरिकांनी सतर्क राहून,पहिले चौकशी करून मगच कोणताही व्यवहार करावा. वेळीच सावध होवून भामट्यांच्या भूलथापाना बळी पडू नये,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



टिप्पण्या