- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
या वसतिगृहात हरविलेल्या आणि अनाथ मुलींच्या राहण्याची व्यवस्था शासकीय योजने अंतर्गत करण्यात येते.
अकोला: खडकी परिसरातील शासकीय जागृती महिला राजगृह येथून गुरुवारच्या मध्यरात्री सहा मुलींनी सिने स्टाईल पलायन केले. शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. खदान पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.
शहरातील खडकी परिसरात महिला व बाल विकास विभागाचे शासकीय जागृती महिला राजगृह आहे. या वसतिगृहात हरविलेल्या आणि अनाथ मुलींच्या राहण्याची व्यवस्था शासकीय योजने अंतर्गत करण्यात येते.
पळून गेलेल्या मुली १८ ते २५ वर्षे वयोगटातील आहेत. या मुलींनी गुरुवारच्या रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास पलायन केले असावे,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय जागृती महिला राजगृहच्या दुसऱ्या मजल्यावर साडी बांधून या मुली खाली आल्या असाव्यात. घटनास्थळी दुसऱ्या मजल्यावर बांधलेली साडी खाली लोंबकळत असलेली दिसत असल्याने, साडीचा आधार घेवून खाली उतरून मुलींनी सिनेस्टाईल पलायन केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वसतिगृहात मुली आढळून आल्या नसल्याने शासकीय जागृती महिला राजगृहच्या अधीक्षकानी खदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. खदान पोलिसांनी मुली हरविल्या असल्याची तक्रार दाखल करून घेतली. खदान पोलिस मुलींच्या छायाचित्र वरुन शोधकार्य सुरू केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा