गुरुदत्त शंकर पागृत यांच्या शेतातील 10 बाय 5 मीटरचा सोयाबिन पिकाचा प्लॉट घेऊन तेथील पिकाची कापणी सर्वांसमोर करण्यात आली.
#Soybean harvest demonstration at #Aliabad
अकोला: अकोला तालुक्यातील आलीयाबाद येथे आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत सोयाबिन पिक कापणी प्रयोगाचे प्रात्यक्षिक झाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे, तालुका कृषि अधिकारी दिनकर प्रधान, मंडळ कृषि अधिकारी प्रकाश राऊत, रामकृष्ण फुलारी, पर्यवेक्षक गजानन महल्ले, तलाठी धनश्री पाटकर, कृषि सहाय्यक रविद्र माळी यांची उपस्थिती होती.
आलीयाबाद येथील गुरुदत्त शंकर पागृत यांच्या शेतातील 10 बाय 5 मीटरचा सोयाबिन पिकाचा प्लॉट घेऊन तेथील पिकाची कापणी सर्वांसमोर करण्यात आली. यावेळी सोयाबिन पीक मळणीपुर्वी 17.41 किलो ग्रॅम भरले. मळणी नंतर सोयाबिणचा उतारा 2.710 किलोग्रॅम इतका आला. यावरुन अंदाजे हेक्टरी साडेपाच ते सहा क्विंटल सरासरी पीक होणार असल्याचा अंदाज काढण्यात आला.
यावर्षी अती पावसामुळे सोयाबिन पिकावर खोड अळी आली. तसेच पावसामुळे पीकातील दाने कमी प्रमाणात भरले. त्यामुळे उतारा कमी आला, असा प्राथमिक अंदाज असल्याचे कृषी विभागाने सांगीतले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमीचा vidio पाहण्यासाठी येथे क्लीक करा:: Soybean harvest demonstration at Aliabad
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा