अखेर मजूर वर्गाने सनदशीर मार्गाने एक दिवसीय उपोषण करण्याचा मार्ग अवलंबिला.
Workers went on a one-day hunger strike at the Agriculture University campus
अकोला: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील रोजंदार मजुरांच्या प्रलंबीत समस्यांचा निपटारा होत नसल्यामुळे, आज या मजुरांनी विद्यापीठ परिसरातील प्रशासन भवन समोर एक दिवसीय उपोषण केले. या आंदोलनाला रोजंदार मजूरांनी लक्षणीय सहभाग दिला.
या मागण्यांसाठी केले उपोषण
*विद्यापीठातील रोजंदार मजुरांच्या
किमान वेतन अधिनियमा अंतर्गत मजुरीमध्ये वाढ करणे,
*सर्व विभाग व सर्व स्किम मध्ये सहा दिवस काम व साप्ताहीक पगारी सुटी मिळावी,
*विद्यापीठाची पेरणी योग्य जमीन असून जास्तीत जास्त मजुरांना जास्त दिवस काम द्यावे,
*मिळत असलेली मजुरी आणि राहणीमान भत्ता हा २६ ने भागुन काढण्यात यावा,
*समान काम समान वेतन मिळावे,
या प्रमुख मागण्यां यावेळी रोजंदार मजुरांनी केल्या.
याआधी दिले होते निवेदन
मजुरांच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यात याव्या, अन्यथा ८ऑक्टोबर रोजी एक दिवसीय उपोषण करण्यात येईल, या संदर्भात ५ ऑक्टोबर रोजी विद्यापीठ कुलगुरूंना रोजंदार मजूर संघटनेच्या वतीने निवेदन दिले होते. त्यापूर्वी सुध्दा अनेकदा मजुरांनी आपल्या मागण्या विद्यापीठ प्रशासनाकडे मांडल्या. मात्र, यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही.अखेर मजूर वर्गाने सनदशीर मार्गाने एक दिवसीय उपोषण करण्याचा मार्ग अवलंबिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा