- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साधारण दोन लाखाचे नुकसान झाल्याने या हतबल झालेल्या शेतकऱ्यांने २४ ऑक्टोबर रोजी उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
अकोला: बाळापूर तालुक्यातील ग्राम अंदुरा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कपाशीची लागवण केली. मात्र, या कपाशीला कुठलेच पीक न आल्याने शेतकऱ्याने बियाणे कंपनी व कृषी केंद्राशी वारंवार संपर्क केला. कंपनी व केंद्रा कडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शेतकऱ्याने उरळ पोलीस स्टेशनला तक्रार केली.
अंदुरा येथील शेतकरी प्रवीण उर्फ बाबूराव राखोंडे यांनी आपल्या चार एकर शेतात राशी कंपनीच्या वाणाचे ६५९ बिजी २ तसेच मेघना बिजी २ ची सात जून रोजी पेरणी केली. चार महिने उलटूनही या बियाणे कपाशीपासून कापूस वा कोणतेच उत्पन्न घेता आले नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी तेल्हारा येथे जेथून बियाणे विकत घेतले त्या भुमिपुत्र कृष सेवा केंद्रच्या संचालकाशी संपर्क साधला. त्यानंतर बियाणे कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना याबाबत वारंवार अवगत केले.मात्र, शेतकऱ्याला कृषी केंद संचालकाने आणि बियाणे कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने, आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्ष्यात आले.
साधारण दोन लाखाचे नुकसान झाल्याने या हतबल झालेल्या शेतकऱ्यांने २४ ऑक्टोबर रोजी उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. आपल्याला नुकसान भरपाई न मिळाल्यास शेतकऱ्याने सहकुंटब आमरण उपोषण करणार असल्याची चेतावणी दिली आहे.
एका शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीची दखल पोलीस विभाग गांभीर्याने घेतील का,शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देतील का,कंपनी व विक्रेतावर गुन्हे दाखल करतील का,असे एक नाही अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा