Agrasen jayanti: श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने महाराजाअग्रसेन जयंती साजरी

समाजाच्या सेवेचे व्रत महाराजा अग्रसेन यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून अग्रवाल समाज यांची वाटचाल सुरू आहे. 

Agrasen Jayanti on behalf of Shri Ram Navami Shobhayatra Samiti



अकोला
: महाराजा  अग्रसेन यांनी पाचशे वर्षांपूर्वी समाजवादाची स्थापना करून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं होतं आजही त्यांच्या विचार सरणीची त्यांच्या कार्य करण्याची गरज  महाराजा  यांचे  वंश अग्र बंधूंनी देशात धार्मिक सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये प्रगती करून नवीन परंपरा व समाजात सेवेचे नवीन आयाम निर्माण केले आहे हे प्रेरणादायी कार्य असल्याचे प्रतिपादन श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवा अधिकारी अकोला पश्चिमचे भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.


श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने अग्रसेन जयंती निमित्त अग्र बंधूंचा स्वागत कार्यक्रम ठेवण्यात येत असतो. परंतू, covid-19 च्या पार्श्वभूमीवर आपली परंपरा व संस्कृती कायम ठेवण्यासाठी श्री रामनवमी शोभायात्रा समितीने निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी व महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते .



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक रामभज गुप्ता हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून रामनवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, डॉक्टर अभय जैन ,डॉक्टर संजय सोनवणे ,गिरीराज तिवारी ,अनिल मानधने ,अनिल थानवी, ब्रिजमोहन चितलांगे, मोहन गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराजा अग्रसेन व श्रीमहालक्ष्मी यांची पूजन व महाआरती करून अग्र बंधूंना शुभेच्छा देऊन महालक्ष्मीचे पूजनचे महत्व आमदार शर्मा यांनी विषद केले. तसेच अगरवाल समाजाची महती सांगून देशभरात अनेक धर्मशाला जलसेवा अन्नदान कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. समाजाच्या सेवेचे व्रत महाराजा अग्रसेन यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून अग्रवाल समाज यांची वाटचाल सुरू आहे. याबद्दल श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आमदार शर्मा यांनी साधुवाद दिला. तसेच रामनवमी शोभायात्रा समिती गेल्या २८ वर्षापासून जयंती कार्यक्रम सातत्याने करत असते ती परंपरा कायम ठेवून आज श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे पदाधिकारी नवीन गुप्ता यांच्या निवासस्थानी पूजा-अर्चना करण्यात आली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी तर संचालन संदीप वाणी तर आभार प्रदर्शन मनिष बाछुका यांनी केले.

यावेळी नितीन जोशी, श्वेता गुप्ता, नितीन गुप्ता, सतीश ढगे, राजेंद्र गिरी, राम ठाकूर, बाळकृष्ण बिडवई, अजय शर्मा, सागर शेगोकार, प्रतुल हातवळणे, अनुराग अग्रवाल, टोनी जयराज, पुष्पा वानखडे, रेखा नालट, कल्पना अडचुले, पद्मा अडचुले, मीरा वानखेडे, चंदा शर्मा, मनीषा भुसारी, मनीषा भंसाली, चंदा ठाकुर, मालती रणपिसे, अलका देशमुख, सोनल शर्मा, गीतांजली शेगोकार, हिरालाल कृपलानी, बाळ टाले, वसुधा बिडवे, संतोष शर्मा, सुरेखा अग्रवाल, प्राध्यापक अनुप शर्मा, अर्चना शर्मा, आरती शर्मा, श्रीराम देशमुख, संतोष काटे, गजानन मानखैर, ज्योति शर्मा, अर्चना चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पण्या