Umed Abhiyan: उमेद अभियानाचे खाजगीकरण थांबवा;अन्यथा आंदोलन Stop privatization of Umed Abhiyan; otherwise agitation

उमेद अभियानाचे खाजगीकरण थांबवा;अन्यथा आंदोलन

Stop privatization of Umed Abhiyan; otherwise agitation



अकोला: महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या अभियानातील राज्यभरातील चार हजारांच्या जवळपास कर्मचारी संकटात सापडले आहेत. अभियानाला जोडलेल्या सुमारे ५० लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाल्याचा दावा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उमेद अभियानाचे खाजगीकरण थांबवा, अशी मागणी उमेद अभियानला जुळलेल्या महिलांनी केली. याबाबत जिल्हा समन्वयक व जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांना निवेदन दिले.



शासनाच्या सहकार्याने सुरु असलेल्या उमेद अभियानात जवळपास ५० लाख महिला जोडल्या गेलेल्या आहेत. या महिलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि त्यातुन त्यांना शाश्वत उपजिविका निर्माण करुण देण्यासाठी अभियानाने समर्पित कर्मचारी व अधिकारी यांची कंत्राटी स्परुपात भरती केली आहे. 


८ ते १० वर्ष शासनाला आपली सेवा दिल्यानंतर अचानक कार्यमुक्त केल्याने हे कर्मचारी संकटात सापडले आहेत. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कर्मचारी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. हा प्रकार थांबवून महिलांना न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी प्रतिभा अवचार यांच्यासह हर्षा भगत, दिक्षा तिडके, ज्योती हागवणे, माया ढोरे, जयमाला रायबोले, वैशाली ढोकणे, वाय.जी.मानतकर, संगिता धारकर यांच्या सह अनेक महिला कर्मचारी सहभागी झालेल्या होत्या.



"महिला उमेद अभियानांतर्गत काही उत्पादने करुन, व्यवसायाची कास धरुन आत्मनिर्भर होत आहेत. परंतु त्यांच्या प्रगतीला नविन दिवा देण्याऐवजी शासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. ज्यांचे वार्षिक करार संपले त्यांना बिनपगारी ताटकळत ठेऊन अभियानावर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील हजारो महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने उमेद अभियानाचे खासगीकरण त्वरित थांबवावे. अन्यथा, हजारोंच्या संख्येने तीव्र आंदोलन छेडणार."

-प्रतिभा अवचार 

जिल्हा समन्वयक, उमेद अभियान 

टिप्पण्या