Teachers day:जय बजरंग विद्यालय कुंभारी येथे “शिक्षक दिन” साजरा

जय बजरंग विद्यालय कुंभारी येथे “शिक्षक दिन” साजरा


अकोला:भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्मदिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा केल्या जातो. ‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्याच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याचं दिवसाचे औचित्य साधून जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंभारी येथे शिक्षक दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 



कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सदस्य राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त श्रीकृष्ण बिरकड गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. नियोजित कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे पर्यवेक्षक संतोष गावंडे, रमेश अढाऊ, शरद मैद, डॉ सुर्यभान नागुलकर, अविनाश ढोरे, धनंजय पुसेगावकर, संध्या ताडे, आशा ताडे, बी.एस.तायडे, जानराव आगळे, सिताराम शिंगाडे, सुरेश ठाकरे, विजय शिंगाडे, प्रा.दिलीप चव्हाण, प्रा. प्रफुल्ल देशमुख, प्रा. दिलीप अप्तुरकर, प्रा. अनिता खंडारे, प्रा. अशोक रहाटे प्रामुख्याने उपस्थित होते. 



श्री बिरकड गुरूजी यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शुभेच्छा देत विघातक महामारीच्या काळात देशा करिता सुजाण विद्यार्थी घडविण्यासाठी आपल्या कार्यात सतत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज झाली असून “शिक्षक सुरक्षित तर राष्ट्र सुरक्षित” अशा मर्मस्पर्शी भाषेत आपले मनोगत व्यक्त केले.



             

टिप्पण्या