- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सुनील वानखडे यांची जिल्हा क्रीडा खेळाडू (दिव्यांग) पुरस्कारासाठी निवड
अकोला:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यावेळी मात्र, प्रथमच हा मान आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सुनील भाऊराव वानखडे यांना व्हीलचेअर फेनसिंग( तलवारबाजी) या खेळासाठी 2019-20 साठी यांची दिव्यांग गटातून निवड करण्यात आली.
जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळवणारे हे अकोल्यातील पहिलेच दिव्यांग खेळाडू आहेत. ते दिव्यांग क्रीडा क्षेत्रात ११ वर्षे पासून सक्रिय कार्य करीत आहेत..सुनील वानखडे यांनी आतापर्यंत राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर तलवारबाजी, हॉलिबाल, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन अश्या विविध खेळत आतापर्यंत ६० पेक्षा अधिक मेडल्स मिळवली आहेत. त्यांना हा पुरस्कार पाच सहा वर्षापूर्वीच मिळायला हवा होता,असे त्याचे म्हणणे आहे. पण या पुरस्काराने एक वेगळी ऊर्जा निश्चितच मिळणार आहे व दिव्यांग क्रीडा स्पर्धेत अकोला संपूर्ण महाराष्ट्रात चमकणार आहे.
सुनील वानखडे हे गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळवणारे अकोल्यातील पहिलेच खेळाडू ठरणार आहेत. हा पुरस्कार वितरण ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजत नियोजन भवन, जिल्हाअधिकारी कार्यालय, अकोल येथे पालकमंत्री बच्चू कडू ,जिल्ह्याधिकारी जितेंद्र पापळकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
टिप्पण्या
खुप छान सुनील भाऊ
उत्तर द्याहटवा