SP Balasubramaniam death:९० च्या दशकातील जादुई आवाज हरपलागायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे निधन magical sound of the 90's is gone

९० च्या दशकातील जादुई आवाज हरपला...

गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे निधन

The magical sound of the 90's is gone ...

Singer SP Balasubramaniam passes away



मुंबई: ९०च्या दशकात आपल्या जादुई आवाजाने तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेले गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. करोना विषाणूची लागण झाल्याने त्यांना मागील महिन्यात उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. 


यानंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय सूत्रांनी सांगितले होते. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. कोरोनवर मात करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती  अखेर आज त्यांची प्राणज्योत विझली.


सलमान खानचा आवाज

अभिनेता सलमान खान यांच्यासाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.जवळपास सर्वच चित्रपटात सलमानसाठी त्यांनी गाणी गायली. सलमानच्या पत्थर के फूल, हम आप के है कौन, बागी, साजन आदी  गाजलेल्या सर्वच चित्रपटांसाठी त्यांनीच गाणी गायली आहेत. त्यामुळे सलमान खानचा आवाज म्हणूनही त्यावेळी त्यांना म्हटंल जायचे.  हम से है मुकाबला या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता.


१९६६ मधे त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. तेलुगू भाषेतील एका चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. इलया राजा, ए.आर. रेहमान, नदीम-श्रवण, जतीन ललीत आदी अनेक संगीतकारांची एस पी पहिली पसंद होते. हिंदीसह तामीळ, तेलुगु, मल्याळम,मराठी आदी १६ भाषेत त्यांनी चाळीस हजारांहून अधिक गाणी गावून अजरामर केली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांनी भारत सरकारने गौरविले आहे.


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली


"आपल्या नाद-मधूर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांना काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील,ते त्या अर्थाने अजरामर आहेत." अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 

अभिनेता अनिल कपूर,अनुपम खेर यांनी देखील एस पी यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.


टिप्पण्या