Public curfew: विदर्भ चेंबरने प्रशासनाचा जनता कर्फ्यु बाबतचा लिखित आदेश दाखवावा;अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार रहा-श्रीराम सेनाVidarbha Chamber should show written order of administration regarding public curfew; otherwise be ready for legal action: Shriram Sena

विदर्भ चेंबरने प्रशासनाचा जनता कर्फ्यु बाबतचा लिखित आदेश दाखवावा;अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार रहा-श्रीराम सेना


Vidarbha Chamber should show written order of administration regarding public curfew; otherwise be ready for legal action: Shriram Sena



अकोला: विदर्भ चेंबरने जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महानगरपालिका प्रशासनचा जनता कर्फ्यू बाबतचा लिखित आदेश द्यावा, अन्यथा त्यांच्या सर्व पदाधिकारी वर त्यांनी केलेल्या गैरकायदेशीर व असंवैधानिक जनता कर्फ्यू बाबत खोटा दावा केला, व अकोलेकराना खोटा ईशारा दिला,असे समजुन रितसर गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रार करणार असल्याचे श्रीराम सेनेचे जिल्हाअध्यक्ष ऍड. पप्पू मोरवाल यांनी सांगितले.


विदर्भ चेंबर द्वारे २२ सप्टेंबर रोजी "प्रेस वार्ता" पत्रक जारी करण्यात आले. ज्याच्या पैराग्राफ ३ मध्ये स्पष्टपणे असे नमुद करण्यात आले आहे की, "जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन" यांचे पुर्ण समर्थन"  असा उल्लेख आहे. 


याचा अर्थ प्रशासन या स्वयं घोषित गैरकायदेशीर व असंवैधानिक बंदला  जुळलेले आहेत. कोणत्याही शासन कार्यालयाचे समर्थन हे त्या कार्यालयाने निर्गमित केलेले लिखित आदेश असते.

चेंबरनी केलेला दावा व त्या दाव्या सोबत दिलेला जनता कर्फ्यूचा ईशारा किती खरा आहे, हे सिद्ध करण्यासाठी चेंबरने आज  २४ सप्टेंबरच्या सायंकाळी ७ पर्यन्त जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महानगर पालिका प्रशासन यांनी त्यांना निर्गमित केलेला लिखित आदेश सर्व जनतेच्या अवलोकनार्थ जाहिर करावा. त्याची एक प्रत श्रीराम सेना अकोला जिल्हा यांना सुद्धा द्यावी. जेणे करून चेंबरने केलेला दावा व इशारा कायदेशीर आहे, असे सिद्ध होईल.अन्यथा, विदर्भ चेंबरने आपला जनता कर्फ्यू मागे घ्यावा. 




चेंबरने लिखित आदेशची प्रत जनते समोर न ठेवल्यास विदर्भ चेंबरने खोटा दावा व खोटा इशारा दिला, असे समजुन "डिसास्टर मैनेजमेंट एक्ट २००५ च्या" कलम- ५२ खोटा दावा करणे व कलम- ५४ खोटा ईशारा देणे या अंतर्गत चेंबरच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी वर गुन्हा दाखल होणे करीता रितसर तक्रार, श्री राम सेना, अकोला जिल्ह्याच्या वतीने देण्यात येईल, असे वक्तव्य श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष ऍड पप्पु मोरवाल यांनी केले आहे.



टिप्पण्या