Post office:पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पंचतारांकित ग्राम योजना जनतेसाठी लाभदायक- संजय धोत्रे

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पंचतारांकित ग्राम योजना जनतेसाठी लाभदायक- संजय धोत्रे 

अकोला: ग्रामीण भागामध्ये सर्व शासकीय योजना तसेच बँकिंग व्यवहार एका खात्याद्वारे होऊन नागरिकांना घर बसल्या सुविधा प्राप्त होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या सर्व सामान्य नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस, पोस्टमन यांच्या माध्यमातून पंचतारांकित ग्राम योजना जनतेला लाभदायक ठरेल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री ना संजय धोत्रे यांनी व्यक्त केला.




पंचतारांकित ग्राम योजना भारतीय डाक विभागातर्फे एका नवीन अनोख्या योजनेची सुरुवात 'पंचतारांकीत ग्राम योजना' या सदराखाली गुरुवार, १० सप्टेंबर रोजी करण्यात आली. 



टपाल विभाग हा जनतेचा आजही जीवनातील महत्वाचा घटक आहे याची जाणीव ठेवून राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या संकल्पनेतून टपाल विभागाची (5 Star village) पंचतारांकित ग्राम या योजनेचा शुभारंभ अकोला डाक विभागातील वडद व तीवळी या गावांमध्ये संजय धोत्रे संचार,शिक्षा आणि इलेक्ट्रोनिक्स तथा सूचना प्रद्योगीकी राज्य मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आला.



या योजने अंतर्गत अकोला जिल्ह्यातील वडद व वाशिम जिल्ह्यातील तिवळी हे गाव शुभारंभ प्रसंगी निवडण्यात आले होते.या योजनेचा शुभारंभ ऑनलाईन प्रणाली द्वारा  संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 



महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील वडद, वाशिम जिल्ह्यातील तीवळी सह महाराष्ट्रातील मडिलगे बुद्रुक (कोल्हापूर) ०४. संतोषवाडी (सांगली),अर्जुनसोंड (सोलापूर) आगलावेवाडी (सोलापूर) वावेधर (पालघर) खुंटेवाडी (नासिक) अंजनवाडी (परभणी) खैरी (हिंगोली), गावातही या योजनेच्या शुभारंभ ऑनलाईन प्रणाली दवारा संजय धोत्रे यांचे  हस्ते करण्यात आला. 



या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे टपाल खात्याद्वारे ज्या वेगवेगळ्या बचत योजना, विमा योजना राबविल्या जातात त्यातील 

०१. ग्रामीण भागातील जनतेची पोस्ट ऑफिस बचत बँक, आवर्ती ठेव (आर डी), मुदती ठेव (टाईम डीपोझीट). 
०२. सुकन्या समृद्धी योजना.
०३. ग्रामीण डाक जीवन विमा. 
०४. प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना/.       प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना. ०५. आय पी पी बी .या योजनांची खाती उघडून गावातील प्रत्येक नागरिकांना यात सहभागी करून घेणे हा आहे.या योजने अंतर्गत वडद शाखा डाकघर येथे नवीन सुकन्या समृद्धी खाते उघडून,खातेधारकास पासबुक सुपूर्द करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी वडद येथील सरपंच दीपक  गोटूकुळे, खातेदार  मानवी  शेरेकर (सुकन्या समृद्धी योजना) उपस्थित होते. 


वाशिम जिल्ह्यातील तीवळी येथे बचत खाते उघडून व खाते धारकास पासबुक सुपूर्द करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी तीवळी येथील सरपंच तथा ग्राम सचिव उलेमाले, खातेदार संदीप साबळे उपस्थित होते.


टपाल खात्याद्वारे नागरिकांसाठी विविध सेवा पुरविण्यात येतात. या योजने अंतर्गत या निवडलेल्या गावातील प्रत्येक घरात पोस्टाच्या या पाच योजना पोहचविल्या जाणार आहेत व प्रत्येक गावातील १०० % जनतेला यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.

 जनधन खाते, गैस सबसिडी, शिष्यवृत्ती असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला, विद्यार्थांना मिळावेत आणि पोस्टाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार व्हावेत या उद्देशाने 'पंचतारांकित ग्राम' ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.


या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी पन्नास गावांची निवड करण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन  ना.संजय धोत्रे यांनी केले.

टिप्पण्या