NEET2020:कोरोनाला न घाबरता भावी डॉक्टरांनी दिली परीक्षा 'नीट' Future doctors give 'NEET' test without fear of corona

कोरोनाला न घाबरता भावी डॉक्टरांनी दिली परीक्षा 'नीट'

Future doctors give 'NEET' test without fear of corona

देशभरात नीट परीक्षा सुरळीतपणे पार


भारतीय अलंकार

अकोला: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी (NEET) आज देशभरात घेण्यात आली.


कोरोना संकटाच्या परिस्थितीत सुरक्षित अंतराचे नियम पाळण्यासाठी यंदा परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. ३,८४३ केंद्रांमधून ही परीक्षा घेण्यात आली.प्रत्येक वर्गखोलीत १२ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्राच्या प्रवेशद्वारावर सॅनिटाईझरची सुविधा उपलब्ध केली होती.


अकोला जिल्ह्याला यंदा प्रथमच नीट परीक्षा केंद्र देण्यात आले.अकोला शहरात १९ आणि अकोट शहर मध्ये ३ परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

भाजपा तर्फे विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध


केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात नीट परीक्षा साठी बाहेर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोया करण्यात आली.अकोल्यातील १९ परीक्षा केंद्रावर भारतीय जनता पार्टी व समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून चौदाशे बत्तीस विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर ४२ चार चाकी,मिनी बस तसेच दुचाकी वाहनाने पोहचविले. 


जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर  सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे कार्य करण्यात आले.


बारावी परीक्षा नंतर जेईई व नीटची परीक्षा घेण्या याव्यात संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतल्यावर त्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, व सहा राज्य विरोधात गेले होते. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यावर सुद्धा covid-19 च्या नावावर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू केला होता,असा आरोप भाजपाने केला.


परंतु, जेईईची परीक्षा यशस्वीरित्या करून covid-19 च्या पार्श्वभूमीवर उत्तम व्यवस्था केल्यानंतर नीटच्या परीक्षेसाठी सुद्धा परीक्षा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करून एका रूममध्ये केवळ १२ विद्यार्थीची परीक्षेची व्यवस्था केली. तसेच covid-19 संदर्भात अनेक उपाययोजना सेंटरवर केल्या,असे देखील भाजपाने म्हंटले आहे.


या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्य शिक्षण राज्यमंत्री  संजय  धोत्रे यांच्या विदर्भ महाराष्ट्र प्रदेश मध्ये विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी  विद्यार्थ्यांना सेंटरवर पोहोचण्यासाठी आवाहन केल्यावर अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला, जळगाव, भुसावळ, धुळे, नाशिक या ठिकाणी विविध संघटनांनी व्यवस्था केली.


अकोला जिल्हा भाजपा तसेच श्री समर्थ  कोचिंग क्लास व श्री समर्थ एज्युकेशन सोसायटीचे नितीन बाठे यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाहने उपलब्ध करून दिली.  विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास मदत केली. भाजपाच्या या उपक्रमात नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर  सावरकर व या कार्यात सहभागी होणारे सगळे पदाधिकारी व श्री समर्थ एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.  देशभरातून व महाराष्ट्रातून प्रतिसाद देऊन covid-19 काळात धोत्रे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने  आभार व्यक्त करण्यात आले.


आज सकाळी नऊ वाजता पासून दुपारी एक वाजता पर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रापर्यंत पोहचविण्याचे काम भाजपा कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी केले.

सर्वप्रथम आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, प्राध्यापक नितीन बाठे यांनी हिरवी झेंडी दाखवून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर रवानगी केली.

 

अकोला शहरात १९ परीक्षा केंद्र होते.जवळपास वीस किलो मीटर दूर असलेल्या केंद्रावर सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था केली. 


या कार्यात गिरीश जोशी, अश्विनी हातवळणे, माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, विनोद बोर्डे ,सागर शेगोकार ,अजय शर्मा, राजेंद्र गिरी ,अमोल गोगे, तुषार भिरड, उमेश गुजर ,टोनी जयराज, नितीन राऊत, चंदा शर्मा ,साधना येवले, नंदा पाटील, निलेश नानोरे, संतोष पांडे, उज्वल  बामनेट, मनीष बुंदिले, प्रतिक अग्रवाल, जयश्री दुबे, दिलीप मिश्रा, हेमंत शर्मा, अभिषेक भगत , बेबीताई गीते, पुष्पा वसतकर,  संतोष पांडे, उपमहापौर राजेंद्र गिरी, सभापती सतीश ढगे,  संजय गोटफोडे,जान्हवी डोंगरे, विक्की ठाकूर, 


महेंद्र राजपूत, सुरेंद्र चौव्हाण, नितेश पाली, तुषार कांतेकर , कृष्णा पांडे, निलेश तायडे, संतोष अग्रवाल, संतोष डोंगरे, भुपेंद्र जोगी, गोविंद टाकसाळकर, मनोज देशकर, निर्मला कराळे ,गितांजली शेवकर, नीलिमा मोरे, संगीता नानोटे, मंगला सोनवणे , मालती रणपिसे, मनिषा भंसाली,  संध्या लोकापुरे, माधव अभिषेक नळकांडे ,अभिमन्यू नळकांडे, संजय बडवणे,  धनंजय ढबाले,  रंजीत खेडकर,  सुरेश वानखडे,  निलेश सौंदळे, सुनील उईके,  गणेश पावसाळे, अक्षय जोशी,

एडवोकेट देवाशीष काकड, राहुल देशमुख ,मिलिंद राऊत, रुपेश लोकापुरे, सोनी देशमुख ,भावेश सोळंकी, हरीश काळे,   दिलीप दिवे, दीपक काटकर, गजानन मानकर , वर्षा गावंडे ,एडवोकेट सुभाष  ठाकूर, अविनाश जाधव, योगेश पाल, नवीन जाधव, भावेश चंदनकर, सिद्धेश्वर काळे, दुर्गेश मात्रे, हरिभाऊ काळे, सतीश येवले, तुषार भिरड, वसंता मानकर,  संजय जिरापुरे, देविदास ढोरे, प्रमानंद ठाकरे, संजय गिरी,  बजरंग वाघ सोनू शेगोकार, कैलास रणपिसे, प्रकाश घोगलीया आदींनी कार सेवा दिली

टिप्पण्या