municipal election: आता पुन्हा वॉर्ड पध्दतीनेच होणार महापालिका निवडणुक

चार सदस्य प्रभागातील विकास कामांसह स्वच्छता, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची स्वच्छता ही सर्व कामे एकमेकांवर ढकलत होते. त्यामुळे प्रभागातील विकासकामे होत नव्हती, असा निष्कर्ष सरकारने काढला.

Now the municipal elections will be held on ward basis again



मुंंबई:- महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे आता राज्यातील सर्व महापालिका निवडणुका यापुढे एक सदस्यीय म्हणजेच वॉर्ड पद्धतीने होईल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधायक मांडले. यामुळे महापालिकांमधील बहुसदस्यीय पद्धत रद्द होणार आहे. 



शिवसेना-भाजपने सत्तेत आल्यानंतर २०१४ मध्ये राज्याच्या महापालिका निवडणुकीत चार सदस्य प्रभागांवर भर दिला होता. मात्र, सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही प्रभाग पद्धत रद्द केली आहे. त्यामुळे आता यापुढे होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये एका वॉर्डातून एकच सदस्य म्हणजेच एक नगरसेवक निवडून येईल.


राज्यातील महापालिका सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झाल्यानंतर त्याला विरोधी पक्ष भाजपने विरोध केला.दरम्यान, चार सदस्य प्रभागातील विकास कामांसह स्वच्छता, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची स्वच्छता ही सर्व कामे एकमेकांवर ढकलत होते. त्यामुळे प्रभागातील विकासकामे होत नव्हती, असा निष्कर्ष सरकारने काढला. यावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर या विधेयकाला मंजुरी देण्यात आली.


टिप्पण्या