Maratha Reservation: महाराष्ट्रातील १८२ श्रीमंत मराठा आमदारांना नको आहे आरक्षण; गरिब मराठ्यांनी बंड करावे - बाळासाहेब आंबेडकर। 182 rich Maratha MLAs in Maharashtra do not want reservation; Poor Marathas should revolt - Balasaheb Ambedkar

महाराष्ट्रातील १८२ श्रीमंत मराठा आमदारांना नको आहे आरक्षण; गरिब मराठ्यांनी बंड करावे -  बाळासाहेब आंबेडकर

182 rich Maratha MLAs in Maharashtra do not want reservation;  Poor Marathas should revolt - Balasaheb Ambedkar



मुंबई: महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. अशा १८२ श्रीमंत मराठा आमदारांना नको आहे आरक्षण गरिब मराठा नागरिकांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारले तरच त्यांना आरक्षण भेटु शकते अन्यथा गरिब मराठ्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल असे स्पष्ट प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केले आहे. 


मराठा आरक्षण मुद्द्यावर राज्यात राजकारण तापत आहे. या पार्श्वभूमीवर ऍड.आंबेडकर यांनी याविषयी आपली स्पष्ट भूमिका मांडली.



महाराष्ट्रातील श्रीमंत १८२ मराठा आमदार हे गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा,अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल असेही आ. बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

टिप्पण्या