JEE2020:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न



अकोला: १ सप्टेंम्बर ते ६ सप्टेंम्बर दरम्यान राष्टीय परीक्षा एजेंसी द्वारे जेईई -२०२० परीक्षा भारतभर घेतली गेली. सुरवातीला पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबद्दल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण होते, परंतु परीक्षा ज्या काटेकोर पद्धातीने व कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजने नुसार घेतली गेली ते पाहून पालक निर्धास्त झाले.  दुसऱ्या दिवशीपासून उपस्तिथीमध्ये लक्षणीय वाढ बघितली गेली. 



अकोल्यातील शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय हे सुद्धा भारतभरातील एक परीक्षा केंद्र होते. परीक्षेदरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाययोजना केंद्रावर काटेकोरपणे घेतल्या जात होत्या. सॅनिटायझशन, सोशल डिस्टंसिंग आदी बाबींकडे विशेष लक्ष पुरविले जात होते. विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक होत्या.



परीक्षा सुरू असताना पालकांसाठी दुसऱ्या बिल्डिंग मध्ये बसण्याची कोविड-१९ च्या नियमानुसार व्यवस्था होती. त्यांच्याशी बोलले असता पालकांनी समाधान व्यक्त केले. हि परीक्षा पुढे ढकलली जावी अथवा रद्द व्हावी असे वाटले का? असे विचारले असता विद्यार्थी व पालक दोघांनीही "नाही" असेच उत्तर दिले. कोरोना प्रतिबंधात्मक वातावरण जर काटेकोर पणे पाळले तर लवकर परीक्षा घेणे हेच विद्यार्थ्यांचा दृष्टीने श्रेयस्कर ठरेल. त्यांच्या ज्ञानार्जनात अडथळा येणार नाही.



हि परीक्षा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला (बाभुळगाव) येथे २ शिफ्ट मध्ये घेतली गेली. प्रत्येक शिफ्ट मध्ये साधारणतः १०० विद्यार्थी होते. प्रत्येक  शिफ्टच्या सुरवातीला व संपल्यानंतर परीक्षा केंद्र व परिसर निर्जंतुकीकरण  केल्या जात असे, हे सर्व पाहून पालकांनी परिक्षा व्यवस्थापन तसेच महाविद्यालय यांचे कौतुक केले.



यापुढेही शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात इतर बऱ्याच राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय परीक्षांचे केंद्र नियुक्त झालेले आहे.  येत्या १३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात नीट-२०२० घेतली जाईल व त्यानंतर युजीसी नेट, जेईई ऍडव्हान्स, एमएचटी-सीईटी-२०२० इत्यादी परीक्षा या केंद्रावर होतील. सर्व परीक्षा कोविड-१९ च्या नियमानुसार घेतल्या जात असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालातर्फे करण्यात येत आहे.


“इथे येण्यापूर्वी कोरोना मुळे थोडी भीती वाटत होती पण इथे सगळे नियम छान पाळले जात होते, आम्हाला मास्क पण दिले गेले, हात सॅनिटाइझ केले. चेक करणाऱ्या सर्व लोकांनी कुठेही स्पर्श केला नाही. दुरूनच सर्व काम होत होते.”
- आकांशा कोठाळे (परीक्षार्थी)




“सर्वत्र स्वछता व सोशल डिस्टनसिंग चे पालन होत होते, लॅब मध्ये पण गर्दी नव्हती. आम्ही सगळे दूर दूर बसलो होतो. आमचा हॉल तिकिट सुध्दा स्पर्श न करता तपासले जात होते. त्यामुळे भीती वाटली नाही, मी पेपर व्यवस्थित सोडवू शकलो”
- प्रथमेश खेडकर(परीक्षार्थी)

टिप्पण्या