IPL2020: 'ड्रीम ११'मध्ये तरी वैदर्भीय क्रिकेटपटूंचे स्वप्न पूर्ण होणार आहे का? In Dream 11, though, of Vaidyarbhiyan cricketers Is the dream coming true?

               IPL-2020

                रोजनिशी

       ✍️नीलिमा शिंगणे-जगड


'ड्रीम ११'मध्ये तरी वैदर्भीय क्रिकेटपटूंचे

स्वप्न पूर्ण होणार आहे का?

In Dream 11, though, of Vaidyarbhiyan cricketers Is the dream coming true?




संयुक्त अरब अमिरातमध्ये शनिवार पासून  यंदाच्या आयपीएल १३ व्या हंगामाला सुरुवात झाली. यामध्ये जगभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये वैदर्भीय क्रिकेटपटूंचा देखील सहभाग आहे. दरवर्षी एक-दोन खेळाडूंचा समावेश असतो. यंदा तर ७ खेळाडूंना IPL स्पर्धेत स्थान मिळाले आहे.मात्र,पहिल्या ११ मध्ये प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळण्याची संधी या खेळाडूंना मिळणार की, Dream11 मध्ये सुद्धा खेळपट्टीवर खेळण्याचे स्वप्न स्वप्न म्हणूनच राहील? संघातील प्रत्येक खेळाडूंना वाटत असते आपल्याला खेळण्याची संधी मिळून आपला खेळ जगासमोर आणावा,मात्र, वैदर्भीय खेळाडूंबाबत नेहमीच असे घडते की,त्यांना संघात स्थान तर मिळते.परंतु खेळपट्टीवर खेळण्याची संधी मिळत नाही. आजच्या सामन्यात सुद्धा विदर्भातील अकोलेकर खेळाडूला स्थान मिळालेले नाही.



 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव याचा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात समावेश आहे. अकोल्याचा युवा गोलंदाज दर्शन नळकांडेला किंग्ज इलेव्हन पंजाब संघात स्थान मिळाले आहे.  मागच्या मोसमात देखील दर्शनचा याच संघात समावेश होता. मात्र, एकाही सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली नाही. आजच्या  सामन्यातही दर्शनला खेळण्याची संधी मिळाली नाही.यापुढील सामन्यात त्याला पहिल्या अकरामध्ये संधी देणार का, हे पुढे होणाऱ्या सामन्यात दिसेलच.


दर्शनने मागच्या मोसमात आंतरिक उच्चस्तरीय स्पर्धांमध्ये  विदर्भाचे प्रतिनिधित्व करीत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला यावेळी पदार्पणाची संधी मिळेल,अशी अकोलेकर क्रीडाप्रेमींना आशा आहे.

२०१८-१९ मध्ये महाराष्ट्र विरुद्‌ध रणजीत पदार्पण करणाऱ्या २१ वर्षीय दर्शनने गेल्या मोसमात सैय्यद मुश्‍ताक अली टी-२० स्पर्धेत सर्वाधिक १६ गडी बाद करून  देशात चौथे स्थान पटकाविले होते.  विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत आठ बळी, २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत २२ गडी बाद व २२० धावा, पाच एकदिवसीय ११ बळी आणि केरळ विरुद्‌धच्या एकमेव रणजी सामन्यात ६५ धावा फटकावून आपले अष्टपैलूत्व दर्शनने सिद्‌ध केले आहे. 


विदर्भ एक्सप्रेस उमेश यादव


'विदर्भ एक्सप्रेस' म्हणून ओळख असलेल्या उमेश यादव कडून वैदर्भीय क्रिकेटप्रेमींना खूप अपेक्षा आहेत. २०१० पासून आयपीएलमध्ये तो नियमित खेळत आहे. उमेशला मागची आयपीएल चांगली लाभली नाही. अकरा सामन्यांमध्ये त्याने फक्त आठच गडी बाद केले होते. या कामगिरीमुळे त्याला यंदाच्या IPL मध्ये संघातील स्थान ११ मध्ये की कोणत्या कोणत्या सामन्यात राहील,याकडे विदर्भातील क्रिकेट प्रेमींचे लागले आहे.



४५ कसोटी, ७५ वनडे व ११९ आयपीएल सामन्यांच्या भक्कम अनुभव उमेश जवळ आहे. या IPL मध्ये उमेशला खेळण्याची चांगली संधी मिळाली आणि त्याने यशस्वी कामगिरी केल्यास त्याच्या आयपीएल मधील भवितव्याला नवी झळाळी लाभणार आहे. आगामी आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी देखील भारतीय संघात स्थान निश्चित होवू शकते.   



 

विदर्भातील पाच गोलंदाज IPL मध्ये



यंदाच्या तेराव्या आयपीएलमध्ये विदर्भातील पाच गोलंदाजांचा समावेश आहे. श्रीकांत वाघ, सौरभ दुबे, आदित्य ठाकरे, नचिकेत भुते आणि यश ठाकूर हे या गोलंदाजांची नावे आहेत.

मात्र, पाचही गोलंदाज 'नेट बॉलर' म्हणून IPL मध्ये आहेत.  श्रीकांत हा  राजस्थान रॉयल्स संघात आहे. सौरभ मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. आदित्य बंगळुरू संघात आहे. नचिकेत पंजाब संघात आणि यश पंजाब संघात आहे. करण्यात आली आहे.आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात विदर्भाचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू सहभागी झाले आहेत. 



वैदर्भींयांचे लक्ष आता उमेश यादव आणि दर्शन नळकांडे यांच्या कडे आहे. दर्शनला आजच्या सामन्यात संधी मिळाली नाही.पण, त्याला पुढच्या सामन्यात संधी मिळणार की नाही. उमेश आपल्या  कामगिरीत सुधारणा करून क्रिकेट तज्ञ, जाणकार, क्रिकेट मंडळाचे  लक्ष वेधून घेतो का,याकडे विदर्भातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे,एवढे मात्र निश्चित. 


टिप्पण्या