IPL2020: युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीमुळे विराट सेनेला यश;पदार्पणातच देवदत्तने जिंकले. Due to the penetrating bowling of Yujvendra Chahal, Virat Sena won ; Devdutt won in his debut.

              IPL-2020

                रोजनिशी

       ✍️नीलिमा शिंगणे-जगड


युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीमुळे विराट सेनेला यश;पदार्पणातच देवदत्तने जिंकले

Due to the penetrating bowling of Yujvendra Chahal, Virat Sena won ; Devdutt won in his debut.



Royal Challengers Bangalore (RCB) beat Sunrisers Hyderabad (SRH) by 10 runs in Dubai to kick off their Dream11 Indian Premier League (IPL) 2020 campaign with a win on Monday.


विराट कोहलीच्या नेतृत्वात आरसीबीने आपल्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळविला. युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीमुळे आरसीबीला सामन्यावर विजय मिळवित आला. या सामन्यात युवा खेळाडू देवदत्तने पदार्पणातच क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.


आरसीबीने हैदराबादपुढे १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, हे आव्हान हैदराबाद संघाला पेलता आले नाही.   चहलने १८ धावांत तीन गडी बाद करून  आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.




आरसीबीच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवातच खराब झाली. कर्णधार आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नर झटपट बाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टोव्ह आणि मनीष पांडे यांनी  डाव सावरण्याचा प्रयत्न केले. जॉनी आणि मनीष यांनी ७१ धावांची भागीदारी केली.


जॉनी आणि मनीष जोडी  हैदराबादच्या विजयाचा मार्ग सुकर करीत असतानाच युजवेंद्र चहलने हैदराबादला जोरदार धक्का दिला. चहलने मनीषला बाद करून  जोडी फोडली. मनीषने ३३ धावा केल्या. मनीष बाद झाल्यानंतर जॉनीच्या अंगावर संघाची जबाबदारी आली. 

जॉनीने अर्धशतकही झळकावले. परंतू, जॉनीला यापेक्षा जास्त मोठी खेळी करता आली नाही. जॉनीने सहा चौकार आणि दोन षटकारांसह ६१ धावा काढल्या.चहलच जॉनीला बाद करून आरसीबीला विजयाचा मार्ग दाखविला.


तत्पूर्वी, हैदराबादने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. पण त्यांचा हा निर्णय त्यांच्याच पथ्यावर पडला.आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पलीक्कडने हा चुकीचा असल्याचे सिद्ध केले. आपल्याच पहिल्याच सामन्यात देवदत्तने अर्धशतक झळकाविले. पदार्पणातच देवदत्तने या सामन्यात ४२ चेंडूत आठ चौकारांसह ५६ धावांची दमदार खेळी केली. त्याला  आरोन फिंचनेही सुंदर साथ दिली. देवदत्त आणि फिंच यांनी आरसीबीला ९० धावांची सलामी दिली.




Brief Scores: Royal Challengers Bangalore 163/5 (Devdutt Padikkal 56, AB de Villiers 51; Abhishek Sharma 1/16) beat Sunrisers Hyderabad 153 all out (Jonny Bairstow 61, Manish Pandey 34; Yuzvendra Chahal 3/18) by 10 runs




टिप्पण्या