home isolation: 'होम आयसोलेशन' कोविड रुग्ण घराबाहेर दिसल्यास होणार फौजदारी कारवाई

'होम आयसोलेशन' कोविड रुग्ण घराबाहेर दिसल्यास होणार फौजदारी कारवाई


Criminal action will be taken if the home isolation covid patient is seen outside the house


अकोला,दि.12: कोविड रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविड रुग्णांना  होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) मध्ये ठेवण्यात आलेले आहेत.परंतु काही रुग्ण घराबाहेर निघून गावात फिरताना दिसत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा रुग्णावर फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधितांशी दिले आहेत. 



तसेच रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर तात्काळ दवाखान्यात भरती व्हावे, नियमितपणे ऑक्सिजन लेव्हल तपासणी करण्यात यावी. श्वसनाचा त्रास असल्यास घरी राहु नये, स्थानिक अधिकारी व पथकाकडून नियमित पणे संवाद करावा, वारंवार विचार पूस करावी, शेजारी लोकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे. बाहेर फिरत असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे,असे आवाहन पापळकर यांनी केले आहे.



कोरोना होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांनी आपल्यामुळे कोरोनाचा फैलाव होवू नये, याबाबत दक्षता घ्यावी. आपल्यामुळे कोरोनाचा फैलाव होणार नाही अशी कोणतीही कृती करू नये. असे आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. 



आजपर्यंत जिल्ह्यात 376 जणांना होम  क्वॉरटाइन करण्यात आले आहे. यात अकोला ग्रामीण येथे 19 जण, अकोट येथे नऊ जण, बाळापूर येथे 48 जण, बार्शीटाकळी येथे 16 जण, पातूर येथे 97 जण, मुर्तिजापूर येथे 101 जण, तेल्हारा येथे सात जण तसेच अकोला मनपा  येथे 79  जणांचा समावेश आहे.



नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की, होम आयसोलेशन मध्ये असलेला रुग्ण त्याचा होम आयसोलेशनच्या कालावधी पूर्ण होण्यापूर्वी घराबाहेर फिरताना आढल्यास प्रशासनाला  कळवावे. होम आयसोलेशन 17 दिवसाचा कालावधी आहे.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’मोहीम 15 पासून


कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच मृत्यू दर कमी  करण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहर, गावे, पाडे, वस्त्या व ताडे येथील प्रत्येक नागरिकांपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम  राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना  


मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करावीत. या पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेटी देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचे तापमान Sp०२ तपासणे तसेच Comorbid Condition आहे का याची माहिती घेण्यात येईल, ताप, खोकला, दम लागणे, Spo२ कमी अशी कोविडसदृष्य लक्षणे असणाऱ्या  व्यक्तींना जवळच्या Fever Clinic मध्ये संदर्भित करण्यात येईल. Fever Clinic मध्ये कोवीड-१९ प्रयोगशाळा चाचणी करुन पुढील उपचार केले जातील,  कोमॉर्बीड Condition असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री केली जाईल आणि आवश्यक तेथे औषधे व तपासणीत संदर्भित केले जाईल, प्रत्येक पाच ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भसेवा देईल, घरातील सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोबीड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावुन सांगेल.


मार्गदर्शक सूचनामध्ये नमुद केल्यानुसार लोकसंख्येनुसार प्रा.आ.केंद्र, शहर व गाव येथे आरोग्य पथके तयार करुन त्यांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करावे,  प्रत्येक ५-१० पथकामागे एक डॉक्टर निश्चित करावा व तसे आदेश निर्गमित करावे, कोमॉर्बीड रुग्णांच्या उपचारासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, किडनी


विकार इ. आजारासाठी प्रोटोकॉलनुसार लागणारी औषधींचा साठा प्रा.आ.केंद्र व रुग्णालय स्तरावर उपलब्ध करावा. साठा कमी असल्यास NHM च्या Free Medicine निधीतून खरेदी करावी, ताप उपचार केंद्र (Fever Treatment Center) प्रत्येक ccc, CHC, DCH मध्ये कार्यान्वित करावे. याठिकाणी संदर्भित होणा-या रुग्णांना संशयीत रुग्ण कक्षात दाखल करुन कोवीड-१९ चाचण्या कराव्यात. प्रत्येक तालुक्यात किमान १ ताप उपचार केंद्र कार्यरत असणे आवश्यक आहे, आवश्यकतेनुसार व नवीन ccc,CHC व DCH स्थापन करण्यासाठी नियोजन करावे, ऑक्सीजन  पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन करावे, संशयीत कोवीड-१९ रुग्णांना कडून FTC मध्ये आणण्यासाठी प्रत्येक दोन-तीन प्रा.आ.केंद्रा मागे किमान एक रुग्णवाहिकाची सोय करावी, लोकप्रतिनिधी व खाजगी रुग्णालय, स्वयंसेवीका यांचा या मोहीमेसाठी सहभाग घ्यावा.


‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही कोविड-19 साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची असल्याने या मोहिमेमध्ये कोणत्याही हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे  सूचना असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहे. 



कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजारवर


शनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 359 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 273  अहवाल निगेटीव्ह तर 86 अहवाल पॉझिटीव्ह आले.


त्याच प्रमाणे काल (दि. 11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात  तर खाजगी लॅब मध्ये आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5382 (4288+940+154)  झाली आहे. आज दिवसभरात 100 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 32677 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  31814, फेरतपासणीचे 193 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 670 नमुने होते. आजपर्यंत एकूण 32276 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27988   तर पॉझिटीव्ह अहवाल  5382 (4288+940+154) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आज 86 पॉझिटिव्ह


दरम्यान आज दिवसभरात 86 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 50 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 14 महिला व 36 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील खोलेश्वर येथील चार जण, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन जण, निमवाडी, रामनगर, रणपिसे नगर, बाळापूर नाका, महान व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित शास्त्री नगर, खेतान नगर, जितापूर ता. अकोट, गितानगर, जेतवन नगर, मलकापूर, खेडकर नगर, बलोदे लेआऊट, लहान उमरी, अकोट, करोडी ता. अकोट, गोरक्षण रोड, राऊतवाडी, डोंगरगाव, संतोषनगर, खैर मोहम्मद प्लॉट, खडकी, रेणुकानगर, शास्त्री नगर, गजानन पेठ, डाबकी रोड, पारस, कांचनपूर, वाशिंबा, बार्शिटाकळी, वाडेगाव, उमरी व शिर्ला अंधारे येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 16 महिला व 20 पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील बोर्टा ता. मुर्तिजापूर येथील सात जण, अकोट येथील चार जण,  चोहाट्टा बाजार,  धानोरी ता.अकोट, तोष्णीवाल लेआऊट व केशवनगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित सुभाष चौक, बार्शीटाकळी, पळसोड ता.अकोट, नायगाव, डाबकी रोड, आळशी प्लॉट, माळीपुरा, सिंधी कॅम्प, मधूभारती अपार्टमेंट,जूना कापड मार्केट, गजानन नगर डाबकी रोड, भारती प्लॉट जूने शहर, तारफैल, मलकापूर, मनोरथ कॉलनी, तुकाराम चौक व बापूनगर येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.


दोन मयत


दरम्यान आज दोघांचा मृत्यू झाला. त्यात जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्री नगर, अकोला येथील 60 वर्षीय पुरुष असून तो दि. 11 सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता. त्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना मृत्यू झाला. तसेच जठारपेठ,अकोला येथील 47 वर्षीय पुरुष असून त्याचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


100 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 43 जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून 13  जण, ओझोन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण, कोविड केअर सेंटर, अकोट येथून 11 जण, कोविड केअर सेंटर बार्शीटाकळी येथून तीन जण, तर कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून 25 जणांना असे एकूण 100 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


1088 रुग्णांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5382 (4288+940+154) आहे. त्यातील 177 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  4117 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1088 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 67 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण, अकोट, पातूर व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. बाळापूर येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे आठ  चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तेल्हारा येथे दोन चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तसेच अकोला मनपा व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येथे चाचण्या झाल्या नाही, आयएमए अकोला येथे 10 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 39 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 67 चाचण्यांमध्ये  पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14691 चाचण्या झाल्या त्यात 953 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.


टिप्पण्या