Hathras Atrocities Case: योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो - प्रकाश आंबेडकर

महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे.  

                                       File photo
Hathras Atrocities Case: We Condemn Yogi Government - Prakash Ambedkar



-उत्तरप्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही


पाटणा, दि. ३० - उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काल या तरुणाने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 


उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.


महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे.  या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नसून मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शासन करा. असेही ते म्हणाले.


टिप्पण्या