Farmers hunger strike: निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती

निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांच्या उपोषणाला तूर्तास स्थगिती

Farmers 'hunger strike in Nimbi Malokar postponed immediately after farmers' union promises to fight 



अकोला: शेतकऱ्यांसाठीच्या कर्जपुरवठा धोरणांत बदल होऊन शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचा भांडवली कर्जपुरवठा करण्यात यावा,पीक विमा योजनेसाठी गाव हे एकक ग्राह्य धरण्यात यावे आदी मागण्यांसाठी निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांनी स्थानीक मंदिरात ३ सप्टेंबर पासून उपोषण आरंभिले होते.आज शेतकरी संघटनेच्या लढ्याच्या आश्वासनानंतर निंबी मालोकार येथील शेतकऱ्यांनी उपोषणाला तूर्तास स्थगिती दिली.


गावातील व परिसरातील शेतकरी साखळी पद्धतीने हे उपोषण आंदोलन राबवीत होते. शेतकरी संघटनेचे डॉ.निलेश पाटील,विलास ताथोड,धनंजय मिश्रा यांच्यासह अजय गावंडे यांनी 3 दिवस या उपोषणाला भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले .


शेतकऱ्यांना ईतर व्यवसायिकांप्रमाणे आपल्या धंद्या मध्ये पूर्ण स्वातंत्र्य व दीर्घ मुदतीचा भांडवली पत पुरवठा या साठी शेतकरी संघटना पूर्वी पासून व्यवस्थेशी भांडत असून पीक विमा योजनेसाठी गाव पातळीवर एकक ग्राह्य धरण्यात यावे या साठी सुद्धा शेतकरी संघटना आग्रही आहे. 



कोरोना महामारीच्या व शेतीच्या कामांचे दिवस बघता आपले गावपातळीवरील उपोषण तूर्तास स्थगित करून पुढील काळात आपण जिल्हास्तरावर आंदोलन करू व केंद्र सरकारच्या पातळीवर आपले म्हणणे लावून धरू असे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी उपोषण कर्त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करून उपोषणाची तूर्तास सांगता केली.


या वेळी शेतकरी संघटनेचे विलास ताथोड,डॉ.निलेश पाटील,धनंजय मिश्रा यांच्या सह अजय गावंडे व उपोषणकर्ते शेतकरी  सुधाकर मालोकार,लक्ष्मण गावंडे, गोपाळ इंगळे,रामभाऊ मालोकार,दिनकर मालोकार, अनिल मालोकार, शिवशंकर मालोकार, सुनील पाटकर, विलास देवर, प्रफुल्ल मोरे, प्रमोद इंगळे, विजय इंगोले, ज्ञानदेव मालोकार, शामराव डोंगरे, सुरेंद्र तांगडे, त्र्यंबक मालोकार, शशिकांत मालोकार, वैभव मालोकार, आदित्य मालोकार, संतोष मालोकार, सागर मालोकार, योगेश मालोकार, योगेश मालोकार, प्रभाकर भोरे, गौरव मालोकार यांच्या सह उपोषणकर्ते शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 



या प्रसंगी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुखा समाधानाने जगण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती, तंत्रज्ञान व बाजारपेठाचे स्वातंत्र्य व शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांनी सांगितलेला भारत उत्थान कार्यक्रम लागू करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले.
उपस्थित शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांवर विश्वास ठेवून आपल्या उपोषणाची सांगता केली व शेतकरी संघटनेच्या लढ्यात सहभागी होण्याचे जाहीर केले.

टिप्पण्या