Farmer suicide:सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer commits suicide due to moneylender's harassment


बार्शिटाकळी: बार्शिटाकळी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांगेफळ येथील शेतकरी किशोर शालिग्राम इंगळे यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून शनिवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेबाबत पोलिस स्टेशनमध्ये एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मृतक शेतकरी किशोर शालिग्राम इंगळे यांच्या पत्नीने बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये १३ सप्टेंबर रोजी जबानी रिपोर्ट दिला आहे. त्यामध्ये त्यांनी माझे पती किशोर शालिग्राम इंगळे राहणार चांगेफळ, मला दोन मुली व एक मुलगा होता. आमच्या सासऱ्याच्या नावावर असलेली चार एकर शेती आम्ही एकत्र राहून आमचे पती शेती करून आमचा उदरनिर्वाह करीत होते. 


सततच्या नापिकीला हतबल होऊन मृतक शेतकरी किशोर इंगळे यांनी बँकेचे चेक दामोदर आप्पाजी चौधरी या सावकारा कडून २० हजार रुपयांचे कर्ज काढले होते.हे कर्ज त्यांनी मुद्दल व्याजासहित ४० हजार रुपये परत केले, असे त्यांनी सांगितले होते. हे देऊन सुद्धा सावकार यांनी तुझ्याकडे ५० हजार रुपये बाकी असून, ते लवकरात लवकर देण्यासाठी वारंवार धमक्यांचे फोन येत होते व त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली व सावकाराकडून १२ तारखेला पैसे परत करण्याची तारीख देण्यात आली होती. याची पूर्व कल्पना देण्यासाठी सावकार गावात आल्याचे समजते, जेव्हा मृतक व्यक्तीने पैशाची व्यवस्था न झाल्याने त्यामुळे या विवंचनेतून माझे मृतक किशोर इंगळे ११ सप्टेंबर रोजी शनिवारला संध्याकाळी ६ वाजता घरुन न सांगता निघून गेले व रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मी माझे दीर ज्ञानेश्वर शालिग्राम इंगळे यांनी शोधाशोध सुरू केली.



ज्ञानेश्वर इंगळे व वैभव इंगळे यांना १२ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता सुमारास गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूला विष पिऊन झाडाखाली पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी अकोला येथील मेन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


याप्रकरणी बार्शिटाकळी पोलिस स्टेशन मध्ये आरोपी दामोदर आप्पाजी चौधरी रा. खडकी अकोला यांच्या विरोधात कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसआय ज्ञानेश्वर रामविलास करीत आहे.



टिप्पण्या